बोलठाणला नाक्यावर मुतारीत घाणीचे साम्राज्यमुळे आरोग्यास
बोलठाणला नाक्यावर मुतारीत घाणीचे साम्राज्यामुळे आरोग्यास
वेगवान नाशिक / wegwan Nashik
नांदगाव ,दि.6 जुलै 2024 शनिवार प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील नाक्यावर असलेल्या मुतारीमध्ये घाणीचे साम्राज्य असुन याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला असून याकडे संबंधित विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.या घाणीचे साम्राज्यमुळे आजार झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी हेच जबाबदार राहतील अशी चर्चा नागरिक व ग्रामस्थामध्ये सुरु आहे.
बोलठाण येथील नाक्यावर गावात जाण्याच्या रस्त्यावर नदीच्या कडेला जकात नाक्याच्या बाजुला मुतारी असुन या नाक्याजवळ दुकाने आहेत.तसेच गावात बसस्टॉप आहे.परंतु बसेस व वाहने गावात वाहने,बसेस वळविण्यासाठी जागा नसल्यामुळे या नाक्यावरच बसेस व इतर वाहने या नाक्यावरच थांबतात त्यामुळे प्रवाशी या नाक्याजवळ असलेल्या दुकानाच्या समोर बसतात.
त्यामुळे प्रवाशांना व इतर नागरीकांना नाक्यावर असलेल्या मुतारीत लघु शनकेसाठी जावे लागते.परंतु या मुतारीत घाण साचलेली असते याची स्वच्छता संबंधित विभागा वेळेवर करत नाही. त्यामुळे जीव जंतु होतात . दुर्गंधी होते यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत आहे. तरी संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे.