या मार्गांवर रेल्वेद्वारे धावणार “पंढरपूर आषाढी एकादशी” विशेष गाड्या
भुसावळ, नागपूर,अमरावती, खामगाव इथून धावणार प्रवासी गाड्या
Wegwan Nashik/वेगवान नाशिक :-
5 जुलै :- रेल्वे द्वारा पंढरपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
1. नागपूर-मिरज स्पेशल (२ सेवा)
गाडी क्रमांक 01205 विशेष गाडी नागपूर येथून दिनांक १४.०७.२०२४ रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01206 विशेष मिरज येथून दिनांक १८.०७.२०२४ रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे.
संरचना: एक तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ७ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
2. नागपूर-मिरज विशेष (२ सेवा)
गाडी क्रमांक 01207 स्पेशल नागपूरहून दिनांक १५.०७.२०२४ रोजी ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता मिरज येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01208 विशेष मिरज येथून दिनांक १९.०७.२०२४ रोजी १२.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड , कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे.
संरचना -: दोन तृतीय वातानुकूलित, १४ शयनयान यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
3. नवी अमरावती-पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01119 विशेष नवी अमरावती येथून दिनांक १३.०७.२०२४ आणि १६.०७.२०२४ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01120 विशेष पंढरपूर येथून दिनांक १४.०७.२०२४ आणि १७.०७.२०२४ रोजी १९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल.
थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी.
संरचना- दोन तृतीय वातानुकूलित, ०७ शयनयान, ०७ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
4. खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा)
गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव येथून दिनांक १४.०७.२०२४ आणि १७.०७.२०२४ रोजी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून दिनांक १५.०७.२०२४ आणि १८.०७.२०२४ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १९.३० वाजता खामगावला पोहोचेल.
थांबे: जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी
संरचना – २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ७ सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन.
5. भुसावळ-पंढरपूर विशेष अनारक्षित (2 सेवा)
गाडी क्रमांक 01159 विशेष गाडी भुसावळ येथून दिनांक १६.०७.२०२४ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01160 विशेष पंढरपूर येथून दिनांक १७.०७.२०२४ रोजी २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता भुसावळला पोहोचेल.
थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा.
संरचना ५ शयनयान, ११ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन.
आरक्षण: विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर ०७.०७.२०२४ रोजी सुरू होईल .
तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.