
वेगवान नासिक / wegwan Nashik
नांदगाव, दि.5 जुन 2024 प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– महाराष्ट्र राज्य सरकारने लाडली बहीण योजनेमध्ये काही लाडक्या बहिणीवर अन्याय करत आहेत. यामुळे नांदगाव तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोर्चा काढून तहसीलदार सुनील सौंदाणे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रातील लाखो ड्रायव्हर यांनी खाजगी संस्था कडून, बँकाकडून कर्ज काढून स्वतःच्या नावावर चार चाकी वाहने, जीप, ट्रॅक्टर, टेम्पो घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. मात्र त्यांच्या पत्नी या संसाराला हातभार लागावा म्हणून कपडे, धुनी भांड्यांची कामे करतात. तर काही गाव खेड्यातील ड्रायव्हर भावाच्या पत्नी शेती काम करून मोलमजुरी करतात.
त्या सर्व वाहन चालकाच्या पत्नी लाडली बहीण या योजनेत पात्र असणार नाही. कारण त्यांच्या पतीच्या नावावर चार चाकी गाडी आहे. महाराष्ट्र सरकारने लाडली बहिणींना लाडली बहीण या योजनेतून अपात्र ठरवून नाराज केले आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्रातील सर्व ड्रायव्हर पत्नी बद्दल लाडली बहिणीचा लाभ मिळावा म्हणून आम्ही नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार सुनील सौंदाणे यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला तालुकाध्यक्ष कल्पना दराडे, माझी जिल्हाध्यक्ष स्वातीताई मगर, नांदगाव तालुका अध्यक्ष सुनील, सचिन, नानाभाऊ आहे, प्रकाश दराडे, व इतर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
