माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा आमदार कांदे यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा आमदार सुहास कांदे यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना

वेगवान नाशिक / wegwan NASHIK
नांदगाव ,दि.5 जुन 2024 प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदगाव तालुक्यातून भरघोस प्रतिसाद वाढल्याने शासकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने योग्य नियोजन करून पात्र असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घ्यावी अशा कडक सूचना नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मुंबई येथून दूरध्वनीवरून दिल्या आहेत.
नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे सध्या मुंबई येथे अधिवेशनासाठी असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिला आहेत. आमदार कांदे यांच्या सूचनेनुसार फरहान खान यांनी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी प्राची पवार, मुख्य सेविका गवळी, किरण कांदे, धनंजय काटे, राजेंद्र पवार, प्रमोद भाबड
सागर हिरे, संजय आहेर, शशी सोनवणे, आयाज शेख, सुनील जाधव, प्रकाश शिंदे, किरण देवरे, आदींची बैठक घेऊन सदर बैठकीत ज्या माता-भगिनी यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांची अडचण असेल ती कागदपत्रे आमदार संपर्क कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी त्या त्या गावात जाऊन घरपोच देतील असे ठरवण्यात आले.
या योजनेचा लाभ घेण्यापासून नांदगाव मतदार संघातील माजी एकही माता-भगिनी वंचित राहणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेण्याच्या सूचना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिल्या आहेत.
