चांदवडःप्रेयसीकडुन मोबाईल परत घ्यायला गेला, अन..पुढे काय झालं…
वेगवान नाशिक:
विशेष प्रतिनिधी: ५ जूलै २०२४
प्रेयसीला दिलेला मोबाईल परत आणण्यासाठी गेलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या भावाने व कुटुंबातील इतरांनी मारहाण केल्याची घटना चांदवड तालुक्यातील धोडांबे येथे घडली आहे. प्रियसीला दिलेला मोबाईल परत घेत असताना प्रियकराला झालेल्या मारहाणीने वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी सचिन याने आपली प्रेयसी हिला मोबाईल फोन दिला होता.कालांतराने काही दिवसांनी तिने हा मोबाईल घेऊन जा असे सांगितले असता, सचिन तो मोबाईल घेण्यासाठी रात्रीच्या वेळी गेला असता, मोबाईल घेऊन रस्त्याने परत येत असताना प्रेयसीच्या भावाने त्यांना पाहिल्याने प्रेयसीचा भाऊ आरोपी क्रं १ याने सचिन यास घरात ओढले व आरोपी क्रं २ व ३ यांनी सचिन यास हात चपाटीने मारहाण करत शिवीगाळ केली.
येवल्यात मोठा अधिकारी रंगेहात धरला….! पहा व्हिडीओ
आरोपी क्रं १ याने हॉकीचा दांडा घेऊन फिर्यादीच्या तोंडावर पाठीवर व हातावर अपखुशीने दुखापत केली. व तु परत आमच्या घरी जर आला तर तुझा काटा काढु असा दम दिला.
म्हणुन एकुण चार आरोपींवर वडनेर भैरव पोलिसांत गु.र.नं २००/२०२४ भा.दं.वी कलम ३२४,३२३,५०४,५०६, ३४, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.