नाशिक ग्रामीण

निफाड:एक लाखांची लाच घेताना महावितरणचा उपअभियंता अटकेत 


वेगवान नाशिक/अरुण थोरे

निफाड/दि.०५ जूलै २०२४

नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी येवल्यातील गटविकास अधिकारी व प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून लाच घेताना सापडल्याची घटना‌ घडली असतानाच, पिंपळगाव बसवंत येथील महावितरणच्या उप अभियंता अधिकाऱ्याला एक लाखांची लाच घेताना पकडल्याने नाशिक प्रतिबंधक विभाग पुन्हा एकदा अॅक्टिव्ह मोडवर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी यातील तक्रारदार यांच्या दुकानाचे व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवता काढून घेऊन, त्या ठिकाणी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिक मिटर बसवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी आरोपी लोकसेवक किसन भिमराव कोपनर (वय ४४ वर्षे) (उपकार्यकारी अभियंता) महावितरण पिंपळगाव उपविभाग ता. निफाड यांनी दिनांक ४ जुलै २०२४ रोजी लाचेची मागणी पंचासमक्ष करण्यात येऊन, दिनांक ५ जुलै २०२४ रोजी १ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याने उपअभियंता यांच्यावर पिंपळगाव पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालवालकर व अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप घुगे ,तसेच पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितिन नेटारे आदींनी यशस्वी रीत्या पार पाडली.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!