आरोग्यनाशिक ग्रामीण

जागरुक नागरिकांनी नगरपालिकेला दिले निवेदन

मनसेने घेतला पुढाकार


वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव –

मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाण आय.यु.डी.पी.येथील हिरुभाऊ गवळी मंगल कार्यालयाजवळील मंगलमूर्ती येथील ओपन स्पेसमध्ये मनमाड नगरपालिकेतर्फे अंगणवाडी उभारण्यात आली आहे.

मात्र सदर ओपनस्पेसमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तेथे सर्वत्र मोकाट जनावरे,अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून अशा बिकट परिस्थितीत अंगणवाडीतील लहान बालकांना ये-जा करावी लागते.त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एकीकडे देशामध्ये स्वच्छ भारत अभियान राबविले जाते तर दुसरीकडे लहान मुलांना शिक्षणासाठी अशा प्रकारच्या घाणीतून ये-जा करावी लागते ही खरच मनमाड नगरपालिकेसाठी लाजीरवाणी बाब आहे.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

सदर परिसरातील रहिवाशी घाणीमुळे,दुर्गंधीमुळे तसेच मोकाट जनावरांच्या वावरामुळे त्रस्त झाले असून त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सदर ओपन स्पेसमधील स्वच्छतेबाबत वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला लेखी स्वरुपात कळवूनही नागरिकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सध्या तर पावसाळ्याचे दिवस सुरु असून ओपन स्पेसमध्ये घाणीमुळे पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे.त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव व संसर्गजन्य आजार पसरण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील लहान बालक,महिला व वयोवृध्द नागरिकांच्या आरोग्याचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे उपरोक्त नमुद ओपन स्पेसला चारही बाजूने चांगल्या दर्जाचे वॉल कम्पाऊंड उभारण्याची आवश्यकता आहे.तसेच परिसरातील लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य व ग्रीन जिम उभारण्यात यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांतर्फे करण्यात येत आहे.

आय.यु.डी.पी.परिसरातील गुरु गणेश मेडिकल समोरील रस्ता,गौतम छाजेड यांचे घरासमोरील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.तसेच याव्यतिरीक्त आय.यु.डी.पी. परिसरातील विविध रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य देखील पसरले आहे.त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून दुचाकी वाहनांचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

मनमाड शहरात स्वच्छता व सुव्यवस्था ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी मनमाड नगरपालिकेची असल्याने नगरपालिका प्रशासनास विनंती करण्यात आली आहे की,आय.यु.डी.पी.मंगलमूर्ती जवळील ओपन स्पेसला चांगल्या दर्जाचे वॉल कम्पाऊंड उभारण्यात यावे व परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करावी.

याबाबत येत्या 6 ते 7 दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाविरुध्द परिसरातील नागरिकांना सोबत घेवून तीव्र स्वरुपाचे आमरण उपोषण करण्यात येईल व त्याच्या होणार्‍या  परिणामास सर्वस्वी मनमाड नगरपालिका,आरोग्य विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरुड यांनी निवेदन दिले आहे.

या वेळी माजी जिल्हा अध्यक्ष स्वाती मगर,नांदगाव तालुका महिला अध्यक्ष सौ.कल्पनाताई दराडे मनसेच्या शोभाताई शेजवळ व आ.यु.डी.पी परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. यावेळी सुनंदाताई देशमुख,सारिका निंबोळकर, मंजुळाबाई दराडे,शोभाताई घुले, चैतालीताई काटकर,अर्चनाताई सोनार,प्रतिभाताई मोरे, प्रेरणादायी सरोदे,निरखेडे मॅडम,अंजलीताई जोशी, ज्योतीताई घुले,मेघाताई शिरूड,अर्चनाताई कुलकर्णी,अमोल मगर,दीपक भाऊ गवळी,दीपक कवडे,विलास भाऊ घुले,भागीरथ सोनार,कुंभारे सर, अरबी सरोदे,दीपक घाटे,संतोष काटकर, शिवाजी देशमुख,मेतकर सर,सुजितभाऊ चव्हाण, एस.एस.नाईकवाडे,संजय महाजन,बाळू घुले, आकाश उघडे,डॉ.विश्वास,हेमंत कुलकर्णी,गौतम छाजेड,गुरु गणेश मेडिकल,दीपक घटे, मनसेचे पवन दराडे,अनिल सांगळे,संदीप पांडव आदि उपस्थितीत होते.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!