गारपीट अनुदान वाटपात गैरप्रकार, चौकशीसाठी ग्रामस्थांचे उपोषण
गारपीट अनुदान वाटपात गैरप्रकार चौकशीसाठी ग्रामस्थांचे
वेगवान नासिक / wegwan NASHIK
नांदगाव ,दि. 5 जुलै 2024 (मुक्ताराम बागुल) :–मागील वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या गारपीट अनुदान घोटाळ्याची चौकशी होऊन दोषी असलेल्यावर कारवाई व्हावी व नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी मांडवड येथील ग्रामस्थांचे मांडवड येथे उपोषण सुरू असून ते या मागणीसाठी ठाम आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान गारपीट नुकसान भरपाई मिळावी व नुकसान भरपाईची रक्कम दुसऱ्याच्या नावावर व खात्यावर वर्ग करणाऱ्यावर चौकशी होऊन कारवाई व्हावी यासाठी ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली असून दोषीवर कारवाई करावी जे अनुदान वंचित राहिले आहेत त्यांना अनुदान मिळाली यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुजबळ यांनी पत्र दिले आहे
न्याय मागण्यासाठी आम्ही बारा दिवसापासून उपोषण करत आहोत आमच्या उपोषणाची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली असून मात्र नांदगाव तालुक्यातील प्रशासन ढिम्मपणे बघत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी कारवाई आणि गुन्हे दाखल झाले असे मीडियाच्या माध्यमातून समजले आहे मात्र संशयित आरोपी अजूनही मोकाट फिरताना दिसत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
दोषीमध्ये असलेली ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तु चव्हाण यांचा जावई किशोर लक्ष्मण जाधव हा येथील रहिवाशी नसून त्याच्या नावावर येथे एक गुंठा शेतजमीन नसताना देखील त्याच्या नावावर 56 हजार रुपये कसे पडतात व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेल्या यादीत त्याचे नाव का घेतले नाही ? कोणाच्या आदेशानुसार त्याचे नाव गुन्हा दाखल झालेल्या यादीतून का वगळले? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी करत कारवाई करायची म्हणून करायची असा प्रकार प्रशासन अधिकारातर्फे केले जात असल्याने आम्ही उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
नांदगाव तालुक्याचे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज पासून आरोग्य तपासणी न करण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याचे लेखी पत्र आरोग्य अधिकारी यांना दिले असून आमच्या आरोग्याला तालुका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील ग्रामस्थांनी उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
गारपीट अनुदानात झालेल्या गैरव्यवहार बाबत नांदगाव पंचायत समितीचे गटविकास संजय दळवी यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना बडतर्फ करण्याची मागणी चा प्रस्ताव पाठविला असेल तर त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना तसे लेखी पत्रसह अहवालाच्या नकला देऊन उपोषण कर्त्यांचे उपोषण सोडण्यास का सांगितले नाही..
तसेच नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी जर जी समिती स्थापन केली होती त्या समितीचे अहवालावरून ग्राम विकास अधिकारी सुभाष फक्त चव्हाण यांचे जावई किशोर लक्ष्मण जाधव यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही.? व केलेल्या कारवाईबाबत सविस्तर लेखी खुलासा उपोषणकर्त्यांना देऊन उपोषण सोडण्यास का सांगितले नाही असा प्रश्न देखील मांडवडी येथील ग्रामस्थ, उपोषणकर्त्यांनी बोलताना व्यक्त केला. सदर गारपीटच्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्याने संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांचे लक्ष प्रशासनाकडे लागले असून खरोखर असलेल्या दोशीवर कारवाई प्रशासन का करत नाही हा कुठल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
