नाशिक क्राईम

तिन मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी घेत आत्महत्या


वेगवान नाशिक/अतुल सूर्यवंशी

सटाणा/दि.५जूलै २०२४

डांगसौंदाने : बागलानच्या पश्चिम पट्ट्यातील मोठे साकोडे येथील रहिवासी असलेले तुकाराम विठ्ठल देशमुख हे साकोडे फाट्या जवळील आपल्या शेतात राहतात काल दि.4 जुलै रोजी पत्नी सरला व मुली घरातून अचानक कुठे गेल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. सरला यांचे माहेर असलेले मळगाव पिसोरे येथे रात्री तपास केला असता सरला व मुली तेथे नसल्याचे माहिती मिळाली.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

आज सकाळी त्यांचा शोध घेत असताना साकोडे येथे सकाळी आराम नदी काठावरील शिवाजी भाऊपाटील यांच्या मालकीच्या विहीरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत त्यांनी पोलीस पाटील देशमुख यांना माहिती दिली असता, मोठी मुलगी संध्याचा (वय ७) मृतदेह असल्याची खात्री झाली. त्यानंतर मुलीसह(मनुश्री ६, वेदश्री १वर्ष ६महिने) सरला (३०) यांचा मृतदेह आढळला.

सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस पाटील नंदन देशमुख यांनी सटाणा पोलिसांना माहिती देत घडलेली घटना सांगितली. घटनेचे गांभिर्य ओळखत मालेगाव उपविभाग पोलीस अधिकारी नितीन गंगापुरे व सटाणा पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.चारही मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयातील उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. याबाबत सटाणा पोलिसात प्राथमिक स्वरूपात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शकाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत अधिक तपास करीत आहेत.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!