नाशिक ग्रामीण

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्र कक्ष उभारा..पांडुरंग शेळके पाटील शिवसेना तालुका प्रमुख येवला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्र कक्ष उभारा..पांडुरंग शेळके पाटील शिवसेना तालुका प्रमुख येवला


वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव

येवला ता. 4जुलै 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली आहे परंतु या योजनेसाठी तहसील व तलाठी कार्यालय येथे दाखले घेण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत आहे हीच गोष्ट लक्षात घेऊन येथील शिवसेनेच्या वतीने येथील तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात असे म्हटले आहे की उत्पन्नाचा व डोमासाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी तहसील व तालुक्यातील मोठ्या गावांच्या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून द्यावी जेणेकरून महिलांना तात्काळ दाखले मिळतील आणि तालुक्यातील जास्तीत जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील तसेच नवविवाहित महिलांचे रेशन कार्ड मध्ये तात्काळ नाव नोंदणी करून घ्यावी जेणेकरून दाखले काढण्यासाठी त्यांना या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल त्यामध्ये वेळ जाणार नाही. यास मुख्यमंत्री माझी लाडकी बनल्या संदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी येवला तहसील यांच्याकडून स्वतंत्र कक्ष उभारावा अशी मागणी या निवेदनामध्ये केली आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे विधानसभा प्रमुख किशोर सोनवणे तालुका समन्वयक अंकुशराव निकम,महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुमित्राताई बोठे,अरुण देवरे,संतोष वल्टे, योगेश ठाकरे, तेजश्री लासुरे,सुनिता लहरे, अर्चना शिंदे,दीपाली नागपुरे पूनम वरे, बिपिन लासुरे,अनिल वल्टे, रामेश्वर मोकळ यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया…..
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना काढून खऱ्या अर्थाने महिलांना एक मदतीचा हात देऊन खऱ्या अर्थाने भावाचे कर्तव्य पार पाडले आहे.याचमुळे येवला तालुक्यामध्ये जास्तीत जास्त महिला या योजनेच्या लाभार्थी करायच्या आहे यासाठी आम्ही पूर्णा तालुक्यात कॅम्प करून योजनेचे लाभार्थी वाढवणार आहोत या योजनेच्या संदर्भात कसलीही अडचण आल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधा असे आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

पांडुरंग शेळके पाटील शिवसेना तालुका प्रमुख येवला.

 


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!