निफाड:विंचूर झालंय लुटारूंचा अड्डा? लुटमारीच्या घटनांनी विंचुर शहरात दहशत

वेगवान नाशिक/अरुण थोरे
विंचुर/४ जुलै २०२४
विंचुर येथुन गेल्या महिन्यात कांदा व्यापार्याचे सहा लाख रुपये लुटल्याची घटना ताजी असतानाच, काल आणि आज कांदा व्यापाऱ्याच्या मॅनेजरला लुटीचा प्रयत्न व एटीएम फोडीचा प्रकार समोर आल्याने आता विंचुर शहर लुटारूंचा आड्डा तर नाही झाला ना? असा प्रश्न नागरीक व व्यापारी वर्गाकडून उपस्थित होत आहे.
नाशिक-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील विंचूर हे गाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार समिती विंचूर हे कांद्यासाठी नव्याने उदयाला येत असताना विंचूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लुटमारीच्या घटना घडताना दिसत आहे. विंचुर शहरातील लुटमारीच्या घटनांनी विंचुर शहरात एकप्रकारे भयभीत वातावरण निर्माण झाले आहे.
मागील महिन्यात १जून रोजी एका कांदा व्यापाऱ्याचे सहा लाख रुपये पळावल्याची घटना घडली असताना, काल दिनांक तीन जुलै रोजी विंचूर येथील व्यापारी भारत उगमुगले यांच्या मॅनेजर बँकेतून पैसे घेऊन येत असताना एकाने मोटरसायकल आडवी लावून पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. तोच दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ जुलै रोजी पहाटे स्टेट बँक ऑफ इंडिया चे महामार्गालगत असलेल्या एटीएम गॅस कटरच्या साह्याने तोडून तीस लाख रुपये पसार केल्याची घटना समोर आली आहे.
सदर महिनाभरात घडलेली लुटमारीच्या घटनांनी कांदा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कांदा बाजारपेठेमुळे विंचूर शहरातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असताना, येथे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशा पद्धतीची मागणी एकीकडे होत आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.