नाशिक क्राईम

७ जनांच्या टोळक्याचा युवकावर जिवघेणा हल्ला करत, खुनाचा प्रयत्न.


वेगवान नाशिक/अरुण थोरे

निफाड/ दि. ४ जुलै २०२४

निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील सोमठाणे त्रिफुली जवळ १जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान कृष्णा उर्फ किशोर रामभाऊ धोक्रट, (वय २९ वर्ष), (रा. सोमठाणे) याच्यावर ७ जनांच्या टोळक्याने हल्ला करत गंभीर जखमी केले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आरोपींच्या विरोधात काल लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, फिर्यादी संतोष रामभाऊ धोक्रट (वय ३२) सोमठाणे ता.सिन्नर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन गोविंद कोकाटे, रा.सोमठाणे ता.सिन्नर, राहुल उर्फ डोम्या सुभाष आहेर, विकास उर्फ विकी सोमनाथ गायकवाड व इतर अनोळखी ४ व्यक्ती यांनी फिर्यादीचा भाऊ कृष्णा उर्फ किशोर रामभाऊ धोक्रट यास फिर्यादीची भाची व तिच्या पतीच्या झालेल्या वादाच्या कारणावरुन आरोपी सचिन कोकाटे याने कट कारस्थान करुन गैरकायद्याची मंडळी जमवून, आरोपी राहुल आहेर याने हातातील कोयत्याने कृष्णा धोक्रट याचे पोटावर, खांद्यावर वार करुन आपखुशीने गंभीर दुखापत केली. तसेच आरोपी विकास गायकवाड याने हातातील लाकडी काठीने कृष्णा याचे डोक्यावर, कानाजवळ जोरात मारुन दुखापत केली. इतर चार अनोळखी आरोपींपैकी एकाने राहुल आहेर याचे हातातील कोयता घेवुन जखमी कृष्णा याचे डोक्यात मारला व इतर तीन अनोळखी इसमांनी कृष्णास लाथा बुक्यांनी मारहाण करुन तेथून पळुन गेले. त्यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीसात भा.न्या.सं. २०२३ चे कलम १०९,१८९(२), १८९(४),१९१(२),१९१( ३),१९०,६१(२ ) (अ),११८(१)३५२,३५१(२) (३),३५१(४) प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन, आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती कळताच निफाड पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश पालवे,व लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि भास्कर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!