वेगवान नासिक / wegwan Nashik
नांदगाव , दि. 3 जुन 2024 बुधवार. दुष्काळ सदृश्य नांदगाव तालुक्यातील उपाय योजनांना कुठल्या स्वरूपाची चालना दिली हे तालुकास्तरीय यंत्रणेने सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळून द्यावे व अन्य मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सुरू करण्यात आलेल्या उपोषणाचा आजचा सलग तिसरे दिवस असून अद्याप एकही अधिकारी व प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी उपोषण आंदोलन स्थळी फिरकले नाहीत.
विधान परिषद निवडणुकीच्या मतदान मोजणीच्या प्रक्रियेसाठी नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाणे हे नाशिक येथे होते. परंतु त्यांच्या उपस्थितीमध्ये नांदगाव तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार प्रमोद मोरे हे देखील उपोषण आंदोलन स्थळी फिरकले नाहीत.
तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळ दुष्काळसदश्य असून दुष्काळ, कर्जमाफी, पिक विमा, हेक्टरी अनुदानाची वस्तुस्थिती, शैक्षणिक, शुल्क माफी पीक कर्जांचे पुनर्गठाण व शेतीशी निगडित कर्ज वसुली यासाठी कुठल्या संमती व उपयोजना लागू करण्यात आल्या याचा खुलासा व्हावा या मागणीसाठी नांदगाव तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखाली
निलेश चव्हाण, साहेबराव गायकवाड, अण्णा पाटील, दीपक आहेर, कारभारी तीनपावले, सुरेश दंडगव्हाळ, अनिल सरोदे, सचिन सानप, लक्ष्मण फुगीर, कुणाल बोरसे, राहुल कदम, मिलिंद पवार आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
नांदगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते सजन तात्या कवडे, मनमाडचे माजी नगराध्यक्ष रहमान शहा, काँग्रेसचे नांदगाव शहराध्यक्ष मनोज चोपडे, गंगा आप्पा औशीकर, तालीम शेख, सोमनाथ पवार, आयुब शेख, अमोल काळे, दीपक अंभोरे, संगीता सोनवणे, इम्रान शहा, चेतन शिंदे कुपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.