
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला 3जुलै 2024….:-महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफ केले, परंतु दोन लाखाच्या वरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीची वाट बघावी लागत असल्याने शेतकरी मात्र वैतागले आहे
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच शासनाने दोन लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले परंतु त्यावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मात्र सरकार कोणतेही पावले उचलत नसल्याने शेतकऱ्यांचे व्याज अव्वाच्या सव्वा झाले आहे
चालू पावसाळी अधिवेशनात सरकारने दोन लाखाच्या वरील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन न्याय द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, चालू पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यासंदर्भात तरतूद करून अधिवेशनात घोषणा करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
जिल्हा बँकेचे सभासद, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये हजारो शेतकरी दोन लाखाच्या वरील असून पाच-सहा वर्षापासून कर्जमाफी च्या आशेवर बसल्याने अव्वाच्या सव्वा व्याज दर वाढत चालल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले आहेत.
फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सन २००८ ते २०१५ या कालावधीतील दीड लाखापर्यंत कर्ज माफ केले.
सन २०१६-१७ ला जिल्हा बँकेने वाढीव कर्ज दिल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी आर्थिक टंचाईशी झगडत जुने कर्ज भरून नवीन कर्ज उचलले. मात्र सन २०१६-१७ मध्ये पीक कर्ज उचल केलेले शेतकरी चालू कर्जदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीपासून वंचित राहिले.
महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत सन २०१६ ते २०१९ या काळातील दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केले. यात ज्यांचे दोन लाखापर्यंत व्याजासह कर्ज होते त्यांना कर्जमाफीचा लाभ झाला. नाशिक जिल्ह्यात, कांदा, द्राक्षे उत्पादक शेतकरी जास्त असल्याने दोन लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा फटका बसला असून कांदा,द्राक्षे मातीमोल भावात विकावे लागले होते, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून नोटिसा बजावल्या जात आहेत.जे शेतकरी दोन लाखावरील कर्जाची रक्कम अदा करण्यास तयार आहेत त्यांच्यासाठी मात्र सरकारकडून कुठलीही हालचाल केली नाही. बँकेने सरसकट कर्ज वसुली सुरु केली असल्याने पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार केव्हा? त्यामुळे दोन लाखांवरील कर्ज वसुली करून दोन लाख रुपयांची सरकारने हमी घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रतिक्रिया
मी २०१५-१६ मध्ये दोन लाख दहा हजार रुपये पीक कर्ज घेतले होते . २०१९ मध्ये शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, परंतु दोन लाखाच्या वरील शेतकरी मात्र अजूनही वंचितच आहे,अजुनही ती कर्जमाफी मिळालेली नाही, परंतु ही रक्कम दुप्पटीपेक्षा जास्त झाली आहे, तरी शासनाने यावर त्वरीत मार्ग काढावा.
सुनील देशमुख. सायगाव ता. येवला

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये