मनोरंजनमोठ्या बातम्या

बंगाली व हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी नाशिकरोड येथे निधन

नाशिकरोड येथील रहात्या घरी घेतला अखेरचा श्वास


Wegwan Nashik/ वेगवान नाशिक, ४ जुलै.-

बंगाली चित्रपट ‘ संध्या’ मधून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत पुढील तब्बल तीन नशिक हिंदी बंगाली सिनेसृष्टीवर आपले सौंदर्य व दमदार अभिनयाच्या जोरावर ९० पेक्षा अधिक चित्रपट देऊन अधिराज्य गाजवणाऱ्या व बॉलीवूडमध्ये मॉडर्न गर्ल म्हणून प्रसिद्ध पावलेल्या स्मृती विश्वास-नारंग या ज्येष्ठ अभिनेत्रीचे काल वयाच्या १०१ व्या वर्षी बुधवार दि.३ जुलै रोजी नाशिकरोड बिटको कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या चव्हाण मळा येथील राहत्या घरात निधन झाले आहे.

आपला सुवर्णकाळ सन १९६० साली संपल्यानंतर त्या काही काळ कोलकत्ता, लाहोर, मुंबई अन वृद्धत्वाचा काळ नाशिक येथे व्यतित करत असलेल्या या अभिनेत्रीला दादासाहेब फाळके गोल्डन इरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चार महिन्यापूर्वी १७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचा शंभरावा वाढदिवस होता.त्यांचा जन्म आजच्या बांगलादेशातील ढाक्याजवळ असलेल्या भरोसापूर येथे झाला होता. वडील नरेंद्र कुमार व आई ज्योतीमोंई दोघेही शिक्षक होते.त्यांचे शिक्षण कोलकात्यात झाले वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांच्या संध्या या चित्रपटात बालकलाकार म्हणून संधी मिळाली त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही १९५२ ते १९६० या काळात त्यांनी कोलकाता, लाहोर मुंबई तत्कालीन दिग्दर्शक व अभिनेते डॉ एस.डी.नारंग यांच्यासह बॉलीवूड मधल्या समकालीन गुरुदत्त, देवानंद, किशोर कुमार, अशोक कुमार, भगवान दादा, राज कपूर,बलराज सहानी आदिंसह अभिनेत्री नर्गिस,नूतन,कामिनी कौशल,शशिकला, श्माया, निरूपमा यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

एकेकाळी रागिनी नेकदिल,चितगाव आर्मरी, अपराजिता, अभिमान,आरजू, हमदर्द,भागम् भाग, हमसफर, चांदणी चौक, जागते रहो, अरब का सौदागर, हमसफर, चांदणी चौक, बाप रे बाप,डाटा व मॉडर्न गर्ल असे एक ना अनेक हिट चित्रपट स्मृती विश्वास- नारंग यांनी बॉलिवूडला दिले होते. मात्र सरकार दरबारी त्यांची उपेक्षाच झाली.त्यात नातेवाईकांनी त्यांची संपत्ती हडपल्याने स्मृती विश्वास नाशिकला बहिणी नीना यांच्या आश्रयाला काही वर्षांपासून आल्या होत्या.

आजही त्यांच्या नाशिकरोड येथील निवासस्थानी त्यांच्या या सुवर्णकाळाची आठवणी जपणाऱ्या असंख्य फोटो व विविध प्रकारचे अवार्ड संग्रही आहे. कधीकाळी पैसा नावलौकिक व प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असताना याच्यात दुरुस्त अभिनेत्रीच्या वार्धक्याच्या काळात मात्र नशिबाचे फासे उलटे पडले. वयाची शंभरी पूर्ण करून त्यांनी या जगाचा निरोप घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!