नाशिक ग्रामीण

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना शेवटच्या घटका पर्यंत पोहचवा – आ. डॉ. राहुल आहेर


वेगवान नाशिक / बाबा पवार

 

देवळा : महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो.

सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात जुलै – 2024 च्या पावसाळी आशिवेशनातील पुरवणी मागणीत “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ह्या योजनेस आर्थिक तरतूद करून योजना सुरु करण्यात आली असून, त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत. सदर योजने अंतर्गत पात्र  महिलांना त्यांच्या बँक खात्यात दर महा 1500 रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.

राज्यभरात शेवटच्या घटकापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोहचवण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.

चांदवड – देवळा मतदारसंघात देखील  “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” ह्या योजनेस शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी शासकीय यंत्रणे मार्फत प्रत्येक गावात प्रसिद्धी करण्यात येऊन पात्र भगिनीस सदर योजना सुरु होण्याबाबत प्रयन्त करावे तसेच सदर योजनेकामी लागणारे कागदपत्रे देखील तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्या अश्या सूचना आ. डॉ. राहुल दादा आहेर यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व यंत्रनेला दिल्या.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!