नाशिकचे राजकारण

मोठीः आंबादास दानवेंचं निलंबन; विधानपरिषदेत ठराव संमत

मोठीः आंबादास दानवेंचं निलंबन; विधानपरिषदेत ठराव संमत


वेगवान नाशिक

मुंबई, ता. 2 जुलै 2024-  विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांत भिडल्याचे समोर आले आहे. सोमवारी (1 जुलै) विधान परिषदेत दोन्ही बाजूच्या आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका आणि अपशब्द वापरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (भाजप) केला आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दानवे यांच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. शिवाय प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यानंतर सत्ताधारी पक्ष ठाम झाला आणि दानवे यांच्यावर कारवाईची मागणी विधान परिषदेत केली. यानंतर विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काही काळासाठी स्थगिती दिली. त्यानंतर सत्र पुन्हा सुरू झाले.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

यावेळी भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. त्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले. या निलंबन काळात अंबादास दानवे यांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!