
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik,1 जुलै,
देवळाली कॅम्प: – उद्योगात कष्ट गरजेचे पण काम करून घेण्याची कला हेच यशस्वी उद्योगाचा मंत्र असे मत निमाचे माजी अध्यक्ष, उद्योजक शशिकांत जाधव यांनी केले
मराठा उद्योजक विचार विनिमयता सभेचे आयोजन एसव्हीकेटी महाविद्यालय येथे करण्यात आले होते. व्यासपीठावर प्राचार्य संपत काळे, व्यवस्थापन समितीचे विलास धुर्जड, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिनकर पाळदे उद्योजक,शाम जाधव,सेवानिवृत्त नायब तहसिलदार धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना जाधव यांनी व्यवसाय उद्योग असा उभारा की तो व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालला पाहिजे तर त्या उद्योग यशस्वी उद्योग गणला पाहिजे. नविन उद्योग सुरू केल्यावर पाच वर्षे काटकोरपणे व्यावसायिक झाले पाहिजे,
आवक खर्च मेळ घालते गरजेचा असतो,कमाईतून गुंतवणूक गरजेची, स्मार्ट बिझनेसकडे वळण्याची गरज असून कामगारांवर विश्वास टाकता आला पाहिजे, उद्योग करतांना नम्रता गरजेची आहे. व्यवसायासाठी जे कर्ज घ्यायला घाबरू नका पण फेडता येतीलच एवढीच कर्ज घेण्याचे आवाहन केले
कार्यक्रमास गणेश कासार ,गजीराम मुठाळ, प्रशांत बोंबले, शरद कासार, प्रविण पाळदे, रोहित कासार, मंगेश पाळदे,शभगवान तुपे, योगेश हराळे, दत्तात्रय मुठाळ आदींसह पंचक्रोशीतील व्यावसायिक सहभागी झाले होते.
सूत्रसंचालन वैभव पाळदे तर आभार निलेश गोडसे यांनी मानले
