दिंडोरी:पाण्याच्या टाकीत होता बिबट्या
वेगवान नाशिक/सागर मोर
वणी :दि.१ :शेतातील पाण्याच्या टाकीत पडलेला बिबट्या वन विभागाच्या पथकाने बाहेर काढला.दि.१ जुलै रोजी दरेगाव येथील शेतकरी सोमनाथ राऊत यांच्या शेतातील कोरड्या पाण्याच्या टाकीत बिबट्या पडला होता वन विभागाच्या रेस्क्यू टिमने बाहेर काढुन नैसर्गिक आदिवासात सोडले.सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ही बाब लक्षात आलीया बाबत ही माहिती वन विभागाला कळविण्यात आली.या परिसराचे वनरक्षक यांनी ह्या घटनेची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण प्रादेशिक श्रीमती डी. ए. गायकवाड यांना दिली वरिष्ठ अधिकारी उपवंसंरक्षक पूर्व भाग नाशिक उमेश वावरे व सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शानाखाली रेस्क्यू टिम नाशिक यांना पाचारन करण्यात आले.रेस्क्यू टिम घटनास्थळावर दाखल झाली बिबट्या बाहेर काढुन त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्याला नैसर्गिक आदीवासात सोडले जाणार आहे.सदर कार्यवाहित मानव वन्यजीव रक्षक आणि रेस्क्यू नाशिक विभागाचे सदस्य वैभव भोगले पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमराज सुखवाल आणि ऋषिकेश तिवडे तसेच वनविभागचे अधिकारी वनपाल . डी. डी. बागुल , वनरक्षक नाना राठोड, वनसेवक अमृत पवार, वनविकास महामंडळाचे कर्मचारी वनपाल चेतन शिंदे, निलेश कापडने वनरक्षक पुष्पा गंगुर्डे वनसेवक साहेबराव भोये , पुंजा माळेकर यानी परिश्रम घेतले.