नाशिक ग्रामीण

आमदार सुहास कांदेंचे विधानसभेत लक्षवेधी….

आमदार सुहास कांदेंचे विधानसभेत लक्षवेधी...


वेगवान नाशिक / wegwan nashik

नांदगाव , दि. 1 जुलै 2024 सोमवार – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गांजा प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्यावर जी कारवाई झाली आहे त्यात सखोल चौकशी करून खरे दोशींना पकडावे व संतोष अण्णा गुप्ता यांना न्याय द्यावा अशी मागणी नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडल्या.

 

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

या गांजा प्रकरणावर नांदगाव तालुक्यात अप्रत्यक्षरीत्या नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांना लक्ष केले जात होते. जो मोर्चा काढण्यात आला त्यावेळीही‌ बहुतांश वक्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्याकडेच अंगोली निर्देश केल्याचे दिसून येत होते. मात्र दिनांक 1 जून 2024 रोजी सोमवारी थेट विधानसभेत अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केल्याने आमदार सुहास कांदे यांच्यावर विरोधाकाकडून जो संशय व्यक्त केला जात होता त्याला मूठ माती मिळाली आहे.

 

सदरची लक्षवेधी सूचना मांडताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी संतोष गुप्ता हे नांदगाव शहरात किराणा व्यवसाय सांभाळून पोट तिडकेने गोरगरिब लोकांची सेवा करतात. ते एक राजकारणी आहे मात्र आज जी वेळ त्यांच्यावर आली आहे ती भविष्यात कोणावरही येऊ शकते. म्हणून जो अध्यात व्यक्तीने त्यांच्या किराणा दुकानात गांजाची पिशवी घेऊन गेला होता. त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा व या प्रकरणाची नि:पक्ष पातीपणे चौकशी करून संतोष अण्णा गुप्ता यांना न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार वागणी केली.

 

  • दरम्यान संतोष गुप्ता हे ज्या पक्षाचे तालुकाप्रमुख म्हणून काम पाहतात त्या पक्षप्रमुखांनी या घटनेबाबत अजून ब्र  काढलेला नाही. मात्र शिंदे गटाचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी यावर थेट विधानसभेच्या विधान परिषदेत जाऊन आवाज उठवल्याने नांदगाव तालुक्यात याबाबत चर्चेला उधान आले आहे.


मुक्ताराम बागुल

मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!