गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने आलेले दोन तरुण लासलगाव पोलिसांच्या ताब्यात.
गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने आलेल्या दोन तरुणांना लासलगाव पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतल्याची घटना ३० जून रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी लासलगाव येथे दोन तरुण मोटरसायकलवर रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास जात असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व टीमने हटकले असता त्यांनी लासलगाव येथून पळ काढला व ते विंचुरच्या दिशेने पळाले असता,सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे व पो.कॉस्टेबल सुजय बारगळ, चंदु मांजरे यांनी त्यांचा पाठलाग केला.
त्यांना विंचूर त्रिफुली येथे पोलीस कॉन्स्टेबल विजय पैठणकर संदीप नीचळ, संदीप डगळे व अविनाश सांगळे यांनी पकडले.अनिकेत कैलास मळेकर (वय २२) व नामदेव रामभाऊ ढेबे (वय २२)(दोघे रा.धायरी पुणे) असे संशयीत तरुणांची नावे असुन,त्यांच्याजवळ तीन देशी कट्टे व नऊ जिवंत काडतुसे आढळली आहे. दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपींवर लासलगाव पोलिसांत बेकायदा हत्यार बाळागल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच त्यांना रविवारी दि.३० रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उप अधीक्षक डॉ. निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पुढील तपास करत आहेत.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.