वेगवान नाशिक / wegan nashik
नांदगाव दि. 30 जुनं ,2024 इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने मोठा बदल केला असून गेल्या 75 वर्षाहून अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहासात जमा झाले.
नवीन कायद्यानुसार I.P.C. ऐवजी B.N.S. असा उल्लेख पोलीस डायरीत होईल. शिवाय नवीन कायद्याची जबर गुन्हेगारांना बसणार आहे. या नवीन कायद्याची दिनांक 1 जुलै 2024 पासून सोमवारपासून होत आहे.
या संदर्भात नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वकील, पत्रकार यांना आमंत्रित करून कायद्याच माहिती दिली.
जनतेला नवीन कायद्याबाबत अवगत करणे आणि प्रचार प्रसार करण्याची आव्हान यावेळी मीडियाला करण्यात आले.
दिनांक 29 जून 2024 रोजी शनिवारी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये बैठकीचे आयोजन करून कायदा या संदर्भात अवगत केले. यावेळी एडवोकेट सचिन साळवे, नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी
नवीन कायद्यासंदर्भात अलर्ट करण्यात आले. नवीन कायदे काय आहे याची केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमलबजावणी दिनांक 1 जुलै 2024 पासून होत आहे.
यासाठी होणाऱ्या घडामोडी नागरिकांच्या तक्रारीबद्दल नवीन कायद्याची अंमलबजावणी पोलिसांना करावी लागणार आहे. तसेच प्रत्येक घटनेतील कायदे बी एन एस काय असेल याची आरोपींना चांगलीच जबर बसेल
यातून गुन्हेगारीला टाळा बसण्यास मदत नवीन कायद्यानुसार होईल यासाठी पत्रकार, पोलीस, वकील, न्यायधीश आदींना नवीन कायद्याचा अभ्यास करावा लागेल.
शिवाय वेळोवेळी नवीन कायद्याच्या पुस्तकात पाणी चाळवे लागतील. नांदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन कायद्याची जाणीव करून देत प्रचार, प्रसार करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
