मनमाड करजवण पाणीपुरवठा योजनेचे काम 95 टक्के पूर्ण
मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजनेचे काम 95 टक्के पूर्ण
वेगवान नाशिक/wegwan nashik
नासिक दि.30 , नांदगाव प्रतिनिधी -(मुक्ताराम बागुल) : — नांदगाव तालुक्यातचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकार होत असलेल्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड करंजवण पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या एक ते दीड महिन्याच्या आत मनमाड येथील नागरिकांना मुबारक पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर गेल्या कित्येक वर्षापासूनचा पाण्यासाठी असलेला वनवास संपुष्टात येणार आहे.
येवला येथील उपविभागीय अधिकारी बाळासाहेब गाढवे, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहन खान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, शहर प्रमुख मयूर बोरसे, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, महेंद्र शिरसाठ, भाजपाचे नितीन पांडे आदींसह नागरिकांनी मनमाड ते थेट करंजवण धरण अशी नुकतीच संयुक्त पाहणी केली. जलद गतीने सुरू असलेले काम पाहून समाधान व्यक्त केले .
करंजवण धरणातून मनमाड लासलगाव रस्त्यावरील भव्य अशा जलशुद्धीकरण केंद्रात एका तासात एक कोटी लिटर पाणी पोहोच होईल व या ठिकाणी तासाला 12 लाख 50 हजार लिटर पाणी शुद्ध केले जाईल आणि तेच पाणी मनमाड येथील नागरिकांना एका दिवसात शरद पाणीपुरवठा सुरू राहणारा असून प्रति व्यक्तीला 35 लिटर पाणी मिळणार आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मनमाड करांचा लोकवर्गणी अभावी जटिल बनलेला पाणी प्रश्न सुटल्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे. युवा सेना शहर अधिकारी इमले, पिंटू शिरसाट, भाजपा शहराध्यक्ष संदीप नरवडे, मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूड, अंकित पगारे, विशाल अहिरे, सुभाष माळवतकर, दादा घुगे, विशाल सुरोसे
तसेच लोकेश साबळे, मुकुंद झाल्टे, अज्जू शेख, विकास वाघ, अमोल दंडगव्हाळ, बाबा पठाण, लाला नागर, कैलास गोसावी, गजू कासार, गोकुळ परदेशी, मन्नू शेख, संजय दराडे, सनी पगारे, सुरज वाघ, निलेश चव्हाण, विलास शेळके, यावेळी उपस्थित होते
- £
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.