नाशिक शहर
असे होणार कॅन्टोन्मेंटचे मनपात विलीनीकरण ?
संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांकडून विस्तृत मार्गदर्शक तत्वे जाहीर

वेगवान नाशिक/ Wegwan Nashik.२९ जून :-
दक्षिण विभागातील १६ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश
देवळाली कॅम्प :- संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार रक्षा संपदा विभागाने कॅन्टोन्मेंट बोर्डांना सीमांकन व हद्द कमी करण्याबाबत नागरी क्षेत्राची छाटणी करण्याकामी पाचही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली २५ जून रोजी झालेल्या बैठकीचा निर्णय २८ जून रोजी प्रकाशित करण्यात आला आहे.त्या निर्णयानुसार देवळाली कॅन्टोन्मेंटसह दक्षिण विभागातील १६ कॅन्टोन्मेंट बोर्ड त्यांच्या लगतच्या राज्य नगरपालिकांमध्ये विलीनीकरणासाठी विस्तृत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे.याबाबतचे पत्र दोन दिवसांपूर्वी देवळालीसह अन्य १६ कॅन्टोन्मेंट बोर्डांना प्राप्त झाले आहे.
संरक्षण मंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली २५ रोजी दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. यामध्ये संरक्षण वसाहतीच्या अखत्यारीतील दक्षिण विभागातील येणाऱ्या अहमदनगर, अजमेर, औरंगाबाद, बबीना, बेलगाम, कन्नूर, देवळाली, कामठी, खडकी, मोरार, नसिराबाद, पुणे, सागर, सिकंदराबाद या सर्व १६ कॅन्टोन्मेंट बोर्डांमधील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शेजारील राज्य नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचे सुचित केले आहे. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डालगत असलेली लष्करी हद्द सोडून असलेल्या सर्व जागा या राज्य सरकारकडे मोफत हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. हि सर्व मालमत्ता व दायित्व नगरपालिकेकडे हस्तांतरितअबकारी क्षेत्रामध्ये भाडेपट्ट्याने दिलेल्या जुन्या अनुदानित मालमत्ता ता संबंधित राज्य नगर पालिकेकडे हस्तांतरित करण्याचे प्रस्तावित करण्याचे याबाबत लोकल मेंबर ऑथॉरिटीचे अध्यक्ष यांच्याशी सल्लामसलत करून शंका व निरीक्षण स्पष्ट करण्याबाबत सांगितले आहे. त्यानंतर तसे शुद्धीपत्रक प्रसारित करण्याचे सुचित करण्यात आले आहे.
