शितकड्यावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या

वेगवान नाशिक/सागर मोर
वणी – सप्तशृंग गडालगत असलेल्या शिताकड्यावरुन पस्तीस वर्षीय महिलेने उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला.याबाबत माहीती अशी ,शितकड्यावरुन एका महिलेने उडी मारल्याची माहीती पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी यांना मिळाली.ही माहीती सप्तशृंग न्यास व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना मिळाली.त्यानी त्वरेने गडावरील आपत्ती व्यवस्थापन पथकास ही माहीती देऊन शोधमोहीम राबविली.पथकाने अनेक तास मोहीम राबविल्यानंतर सदर महिला सापडली.ही महीलेचे नाव मनीषा योगेश जगताप वय 35, राहणार जाटपाडे ,निमगाव ता.मालेगाव जि नाशिक असे असुन आपत्ती व्यवास्थापन पथकाचे मंगेश केदारे ,संकेत नेवकर ,सागर गावित ,कृष्णा जोपले ,नानाजी सोणवणे ,ज्ञानेश्वर गावित ,पराग कुलकर्णी ,या पथकाने शोधमोहीम राबविली.दरम्यान सदर महिलेस वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मृत घोषित केले.शितकड्यावरुन उडी मारण्याच्या घटना सातत्याने ठराविक अंतराने होत असल्याने ही बाब चिंताजनक आहे.पुढील तपास वणी पोलीस करीत आहे
