वेगवान नाशिक /अरुण गायकवाड
नाशिक,ता २९ जून २०२४- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव देखील मुसळधार पाऊस होत आहे. पुढील पाच दिवसात कोणत्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे जाणून घेऊया.
मान्सून आता राजधानी दिल्लीत दाखल झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
त्यामुळे लोकांनीही सावध राहण्याचं आव्हान करण्यात आलं आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ देखील तुरळक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय इतर राज्यांमध्ये काय आहे परिस्थिती पुढील पुढील दोन ते चार दिवस मध्य भारतातील राज्यांमध्ये आणि पुढील पाच दिवस ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.
गेल्या 24 तासात दिल्ली छत्तीसगड पश्चिम मध्यप्रदेश ओरिसा कोकण गोवा विदर्भ हिमाचल प्रदेश हरियाणा उत्तरखंड उत्तर प्रदेश पंजाब राजस्थान अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय मणिपूर सर्व पश्चिम बंगाल सिक्कीम मध्य महाराष्ट्र केरळ पूर्व मध्य प्रदेश किनारी आंध्र प्रदेश किनारपट्टी कर्नाटक तामिळनाडू येथे मुसळधार पाऊस झालाय मान्सून आता पूर्व राजस्थान हरियाणा दिल्ली पश्चिम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड बिहार पूर्व उत्तर प्रदेश झारखंडमध्ये पोहोचला आहे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून जम्मू चंदिगड पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेशाच्या उर्वरित भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
केरळ लक्षदीप किनारी कर्नाटक विदर्भ छत्तीसगड कोकण गोवा गुजरात मध्य महाराष्ट्र तामिळनाडू पुदुच्चेरी कराईकल किनारी आंध्र प्रदेश रायल सीमा तेलंगणा उत्तर आणि दक्षिण कर्नाटकात पुढील पाच दिवसात जोरदार पाऊस होणार आहे.
उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा चंदिगड दिल्लीमध्ये 29 जून ते एक जुलै उत्तर प्रदेशात 28 ते 30 जून पूर्व राजस्थान मध्ये 29 जून ते दोन जुलै आणि मध्य प्रदेश मध्ये ते 28 ते 29 जून दरम्यान आणि 28 जून पासून ओडिसामध्ये 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे.