मनमाडच्या श्रद्धा हॉस्पिटलवर कारवाईसाठी उपोषण
मनमाडच्या श्रद्धा हॉस्पिटलवर कारवाईसाठी उपोषण
वेगवान नासिक / wegwan nashik
नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलेल्या रेश्मा बनसोडे या महिलेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करून तिचा जीव धोक्यात घातला यातून तिच्या परिवाराला लाखो रुपये खर्च करून कसेबसे तिला वाचविले
त्यामुळे श्रद्धा हॉस्पिटलच्या विरोधात प्रशांत बनसोडे यांनी पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी हा गुन्हा आम्ही दाखल करून घेत नाही तसे उत्तर दिले
यानंतर प्रशांत बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णाला तक्रार दिली त्यांनी देखील आठ दिवसात काहीच कारवाई केली नसल्याने आज शुक्रवारी लोकशाही मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ परिवारासोबत कुपोषण सुरू केले आहे
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे प्रशांत बनसोडे यांनी बोलताना सांगितले.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.