कळवण:वकील असल्याचे भासविले , दिड लाखाला गंडविले.
दिंडोरी:वकील असल्याचे भासविले , दिड लाखाला गंडविले.
वेगवान नाशिक / सागर मोर
वणी, ता.28 जुन 2024 – सरकारी दरबारी वजन असुन वकील असल्याचे सांगुन शेतजमीनीचे वारस लावण्याचे अमिष दाखवुन एक लाख पन्नास हजार रुपये घेऊन संगनमताने कट रचुन ,फसवणुक व विश्वास घात केल्याची तक्रार संदिप भिकाजी अवधुत व एक महिला यांचे विरोधात पोलिस अधिक्षक यांचेकडे आदिवासी युवकाने केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रारीत असलेला उल्लेख असा सुभाष सोमा बागुल रा.सुकापुर ,अभोणा ,ता.कळवण यांचे वडीलांची वडीलो पार्जीत जमीन असुन ती जमीन वारसा हक्काने नावावर करायची होती.
या दरम्यान वडपाडा ,ता.कळवण येथील एक महिलीने सुभाष बागुल यांना सांगितले की आमच्या जमीनीचे काम एका वकीलाने केले आहे.तदनंतर सदर महिलेने तिच्या स्वतःच्या घरी बोलावले .तेथे एक इसम होता.तो संदिप अवधुत आहे अशी ओळख करुन दिली.तो सफेद रंगाच्या स्वीप्ट गाडीतुन आला होता.संदिप अवधुत याने मला सांगितले की मी वकील आहे.नाशिक येथे माझा स्वतःचा रो हाऊस आहे. तसेच सर्व वरीष्ठ अधिकारी माझ्या जवळचे आहे.
मी जमीनीचे कामे करतो असे सांगितले .वडपाडा येथील महिलेच्या घरी संदिप अवधुत याचे नेहमी येणे जाणे असल्याने व ती महिला परीचीत असल्याने त्यावर विश्वास ठेवला.व,त्यानीही संदिप अवधुत वकिल असल्याची सांगुन सरकारी दरबारी वजन असल्याची माहीती दिली.यादोघांच्या बोलाण्यावर विश्वास ठेवला व वेळोवेळी संदिप अवधुत याला रोखस्वरुपात रकमा दिल्या.
त्याचा तपशील असा दिनांक 12/8/2020 रोजी वडपाडा येथे जमीनीचे मुळ 15 दस्ताऐवज व 25 हजार रुपये रोख घेतले काम झाले नसल्याने याबाबत विचारणा केली असता अजुन पैसे लागतील असेषसांगितल्याने.दिनांक 15/10/2020 रोजी खिराड चौफुली या ठिकाणी अजुन पैसे दिलेत तर लवकरात लवकर काम होईल असे सांगितले व 50 हजार रुपये रोख घेतले.व कागदपत्रे तयार करावयाची आहे असे भासवुन पुन्हा वडपाडा येथे 25 हजार रुपये घेतले.तदनंतर साहेबांची बदली होणार आहे.
असे सांगुन 13/3/2021 रोजी 50 हजार रुपये वडपाडा येथे घेऊन सुद्धा काम होईल पण वर्ष लागेल असे सांगुन काम तर केलेच नाही मात्र एकुण 1 लाख 50 हजार रुपये वेळोवेळी घेतले.कामही नाही व पैसेही परत दिले नाही.
तदनंतर संदिप अवधुत याचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व मुळ कागदपत्रे व पैसे परत द्या अशी मागणी केली त्याने पैसे देण्याचे आश्वासन दिले.यानंतर वेळोवेळी अनेकदा संपर्क केला मात्र त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही.वणी येथे संदिप अवधुत याची चौकशी केली असता ते वणीत राहतात व कीलही नाही तसेच बनावट दाखला तयार करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केल्याचा गुन्हा वणी पोलिस ठाण्यातदाखल असल्याचे समजले.संदिप अवधुत रा.दत्तनगर कसबे वणी व सदर महिला या दोघांनी संगनमत करुन ,विश्वासघात करुन आर्थिक फसवणुक केल्याची खात्री झाली असल्याने गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुभाष सोमा बागुल यांनी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांचेकडे लेखी स्वरुपात केली आहे.
13 जून 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कळवण यांचेकडे बागूल यांनी संदीप अवधूत व महिला यांचे विरोधात तक्रार दिलेली आहे.