नाशिकःतंबाखू पुडी वरुन नाशकातील गुंडा भाईने काय केलं! व्हिडीओ

वेगवान नाशिक
पंचवटी, ता. 27 जून 2024 – तथाकथित भाईला तंबाखूच्या पुड्या दिल्या नाही म्हणून म्हसरूळ परिसरातील एका पान टपरीची गावगुंडांनी तलवारीने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत संशयितांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि भूषण कैलास देशमुख, ३१, रा. फ्लॅट नंबर ११, मार्ग रेट टॉवर, हरणपुर गावठाण, कॅनडा कॉर्नर, नाशिक याने दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ गावात जैन मंदिराजवळ भूषण गणेश पान स्टॉल दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. याठिकाणी नेहमी टपरीवर येणाऱ्या भूषण याची संशयित युवराज सोनवणे, वैभव आणि सिद्धार्थ यांच्याशी ओळख झाली होती.
मंगळवार दि. २५ रोजी भूषण संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास तवली फाटा येथून मोटारसायकलने टपरीवर येत असतांना त्याचा भाऊ हर्षद देशमुख याचा फोन आला आणि त्याने सांगितले कि, टपरीवर दोन ते तीन युवक आले आहे. ते सांगत आहे की, युवराज अण्णाने दोन-तीन तंबाखूच्या पुडया मागितल्या आहे. असे सांगितले. त्यानंतर भावाच्या फोन वरून युवराज सोनवणे आणि मित्र भूषण हे माझ्याशी बोलु लागले. त्यांनी सांगितले की, युवराज आण्णाला तंबाखूच्या पुडया दे त्यावेळी मी त्यास रागाने म्हणलो की, पुडया कशाला पुडाच घेवून जा. आणि भावास त्यांना दोन तीन तंबाखुच्या पुडया देण्यास सांगितले. त्यानंतर मी टपरी वर आलो. व भाऊ हर्षद हा कामानिमित्त बाहेर गेला होता.
त्यानंतर टपरीवर एकटा असतांना रात्री आठ वाजेच्या सुमारास युवराज सोनवणे, वैभव व सिद्धार्थ हे माझ्या टपरीवर आले. त्या दोघांच्या हातात तलवारी होत्या व त्यांनी त्यांचे हातातील तलवार टपरीच्या काउंटरवर आपटली. आणि ते म्हणाले की, तु आमच्या युवराज भाईला शिवीगाळ करतो का ? असे बोलून भूषणला शिवीगाळ करीत त्यांनी तु टपरीचे बाहेर ये, युवराज भाई ने आम्हाला तुझा गेम करण्यासाठी पाठवले आहे. हे सांगितल्याने घाबरल्याने भूषण टपरीच्या बाहेर न आल्याने संशयितांनी थेट तलवारी फिरवुन टपरीच्या आतील साहित्याचे नुकसान केले व टपरीतील माल टपरीचे बाहेर फेकून दिला. आणि शिवीगाळ करून संशयित दुचाकीवरून निघून गेले. या घटनेने घाबरून गेलेल्या भूषण याने म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. त्यानंतर भूषण याच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
