त्या मार्गावरील प्रवासी रेल्वे सुविधा अखेर पूर्ववत
शिर्डीसह पुण्याकडे जाणार्या प्रवाशांना दिलासा

वेगवान नाशिक/ Wegwan Nashik
२७ जून :-
मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेंगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेतला आहे त्याकरिता काही गाड्याचे रद्दीकरण आणि मार्ग परिवर्तन करण्यात आले होते . रेल्वे द्वारा आता यामध्ये परिवर्तन करण्यात आले असून या गाड्या पूर्ववत करण्यात आले आहे. आणि आपल्या नियोजित मार्गांने गाड्या धावतील. त्या गाड्या पुढील प्रमाणे –
#या गाड्या धावणार पूर्ववत
1) गाडी क्र. 22223 मुंबई -साई नगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29.06.2024 आणि 30.06.2024 रोजी धावेल.
2) गाडी क्र. 22224 साई नगर शिर्डी- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29.06.2024 आणि 30.06.2024 रोजी धावेल.
3) गाडी क्र. 22147 दादर — साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 जून 2024 रोजी धावेल.
4) गाडी क्र.22148 साईंनगर शिर्डी -दादर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी धावेल.
5) गाडी क्र.12131 दादर -साईंनगर शिर्डी त्रि-साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी धावेल.
6) गाडी क्र.12132 साईंनगर शिर्डी -दादर त्रि-साप्ताहिक सुपरफ़ास्ट एक्सप्रेस, प्रवास सुरु दिनांक 30 जून 2024 रोजी धावेल.
7) गाडी क्र.11041 दादर -साईंनगर शिर्डी एक्सप्रेस (व्हाया पुणे) प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी धावेल.
8) गाडी क्र.11042 साईंनगर शिर्डी -दादर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 30 जून 2024 रोजी धावेल.
*नियमित मार्गांने धावणाऱ्या गाड्या*
1) गाडी क्र.17629 पुणे -नांदेड़ एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 जून 2024 ते 29 जून 2024 रोजी आपल्या नियमित मार्गांने धावेल.
2) गाडी क्र.17630 नांदेड़ -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29 ते 30 जून 2024 पर्यंत रोजी आपल्या नियमित मार्गांने धावेल.
3) गाडी क्र.11078 जम्मूतवी -पुणे झेलम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 27 आणि 28 जून 2024 रोजी आपल्या नियमित मार्गांने धावेल आणि पुणे ला जाईल.
4) गाडी क्र.12780 हज़रत निजामुद्दीन -वास्को गोवा सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 आणि 29 जून 2024 रोजी आपल्या नियमित मार्गांने धावेल.
*शॉर्ट टर्मिनेट*
1) गाडी क्र 17002 सिकंदराबाद –साईंनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 28 जून 2024 रोजी साईंनगर शिर्डी येथे जाईल.
2) गाडी क्र.17001 साईंनगर शिर्डी –सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 29 जून 2024 रोजी साईनगर शिर्डी येथून आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
3) गाडी क्र. 20857 अप पुरी –साईंनगर शिर्डी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस,दिनांक 28 जून 2024 रोजी साईंनगर शिर्डी येथे जाईल.
4) गाडी क्र. 20858 डाऊन साईंनगर शिर्डी –पुरी साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस,दिनांक 30 जून 2024 रोजी साईंनगर शिर्डी आपल्या निर्धारित वेळेत सुटेल.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याची विनंती मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
