निफाड: ढग सदृष्य पावसाने दोन विहिरी कोसळल्या, लाखोंचे नुकसान!

वेगवान नाशिक/अरुण थोरे
निफाड/ दि.२७ जून २०२४
निफाड पूर्व भागात सोमवार दिनांक 24 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने गोंदेगाव तालुका निफाड येथील दोन शेतकऱ्यांच्या विहिरींचे कठडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कारभारी विठ्ठल नाईक यांच्या गट नंबर 408/ 1 मधील सुमारे नऊ परस खोल विहिरीचे 14 कठडे जोरदार पावसामुळे पडले असून सोबतच इलेक्ट्रिक मोटर कनेक्शन दाबल्यामुळे सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले तर दुसरीकडे पंढरीनाथ गणपत निकम आणि संजय निकम यांची सामायिक आठ परस विहिर कोसळल्याने त्यांचेही पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
निफाड पूर्व भागात झालेल्या या जोरदार पावसामुळे दोन्हीही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाने तलाठी पराग साळवे यांच्यासह कोतवाल किशोर गाढे यांनी पाहणी करून पंचनामा केला. याबाबत त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दोन्ही शेतकऱ्यांकडून होत आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.