
वेगवान नाशिक/Nashik/नाशिक,अविनाश पारखे,मनमाड,नांदगाव –
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या चार जागा पैकी नाशिक विभागातून शिक्षक मतदार संघातून शिक्षक आमदार निवडीसाठी काल मतदान झाले. जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.
नांदगाव तालुक्यात पुरुष 669 तर स्त्रिया 374 असे एकूण 1043 मतदार होते.पैकी मतदानाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत तालुक्यातील तहसील कचेरी येथील मतदान केंद्रावर एकूण पुरुष मतदारांपैकी 626 तर एकूण स्त्रिया मतदारांपैकी 339 असे एकूण 965 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यासाठी एकच मतदान केंद्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी झालेली होती.शिक्षक मतदार तास,दोन तास रांगेमध्ये उभे राहिलेले होते.मतदान शांततेत पार पडले.
21 उमेदवार यांना पसंती क्रमानुसार पसंती क्रम देऊन मतदान करायचे होते.त्यामुळे मतदारांना मतदान करताना उशीर लागत होता.परिणामी मोठ्या संख्येने मतदार रांगेमध्ये बाहेर उभे राहिलेले दिसले.कित्येक मतदारांनी एक,दोन,तीन किंवा चार असेच क्रमांक देऊन इतर क्रमांक देण्याचा कंटाळा केल्याचे मतदारांमध्ये बोलले जात होते.कदाचित चुकीच्या पद्धतीमुळे मतदान बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती तर मतदारांना मतदान करण्यासाठी वेळ लागू शकतो त्याचा कोणताही विचार न करता रांगेतील मतदारांसाठी बैठक व्यवस्था देखील केलेली नव्हती असे मतदारांनी चर्चेत सांगितले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून संदीप दळवी यांनी कामकाज पाहिले.पोलीस निरीक्षक आव्हाड,शिपाई कुंटेवाड व पवार यांचा बंदोबस्त होता.
आता संभाव्य शिक्षक आमदाराचे नशीब मतपेटीत बंद झालेले आहे.1 जुलै रोजी मतमोजणी नाशिक येथे होणार आहे.सुज्ञ आणि प्रतिष्ठित समजल्या जाणार्या शिक्षक वर्गाने आपल्यासाठी कोणता प्रतिनिधी निवडला?हे 1 जुलैलाच कळेल.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…