नाशिक शहर
या मान्यवरांचा होणार दुसऱ्या सह्रयाद्री मित्र संमेलनात गौरव
बीवायके महाविद्यालयाच्या गुरूदक्षिणा हॉल येथे रविवार दि. ३० रोजी आयोजन

Wegwan Nashik/वेगवान नाशिक, २६ जून :-
सह्याद्रीच्या कुशीतील किल्ले असो व डोंगर दऱ्या,नयनरम्य धबधबे असो वा निसर्गाचे अदभूत दर्शन हे सर्व आपल्या जिद्दीने अनुभवणाऱ्या ट्रेकर्स, डोंगर प्रेमी शोधकरी गिर्यारोह दुर्गाभ्यास दुर्ग संशोधक निसर्गप्रेमी लेखक कवी ट्रेकर्स व युट्यूबर यांचा कुंभमेळा समजले जाणारे सह्याद्री मित्र संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून ज्येष्ठ गिरीभ्रमणकार अविनाश जोशी यांच्या स्मृतिपित्यर्थ आयोजित करण्यात येणारे हे ‘ दुसरे सह्याद्री मित्र संमेलन‘ नाशिक येथील कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या गुरूदक्षिणा हॉल येथे रविवार दि. ३० रोजी सकाळी ११ ते ५ वा. दरम्यान‘आयोजित करण्यात आल्याची माहिती सह्याद्री मित्र संमेलन नाशिक आयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
या संमेलनाची यावर्षीची संकल्पना ‘सह्याद्री पाहू या – सह्याद्री जगू’ अशी आहे. या एक दिवसीय संमेलनात अनेक नामवंत गिर्यारोहकांचे अमूल्य विचार आणि अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहे. दुसऱ्या सह्याद्री मित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ गिर्यारोहक,गिरिप्रेमी उमेश झिरपे हे राहणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ट्रेकर व मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव डॉ. नितिन करीर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने विविध राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व यानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा– २०२४ च्या विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. तर विशेष उल्लेखनीय कामगिरी संस्था सन्मान -२०२४ म्हणून सेफ क्लाइंबिंग इनिटीऍक्टिव्ह (पुणे) व मैत्रेय प्रतिष्ठान ( कोल्हापूर), ट्रेक क्षितिज संस्था (डोंबिवली ) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी शनिवार दि. २९ रोजी सकाळी ११ वा. छायाचित्रकार व ट्रेकर दिलीप गीते यांनी टिपलेल्या सह्याद्रीची विविध रूप, प्राणी, पक्षी व माणसांचे अप्रतिम अशा छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय वाईल्डलाईफ फोटोग्राफर बैजू पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
# २०२४ वर्षाच्या पुरस्काराचे मानकरी
१) सह्याद्री रत्न पुरस्कार- आनंद पाळंदे (पुणे)
२) सह्याद्री युवा रत्न पुरस्कार- प्रियंका मोहिते (सातारा)
३) सह्याद्री ‘ वाटाड्या ‘ऑफ फ द इयर- पुरस्कार एकनाथ खडके (घाटघर)
४) ‘ क्लाईंबर ‘ ऑफ फ द इयर- पुरस्कार इंद्रनील खुरुंगळे (बदलापूर)
५) ‘क्लाइंबिंग टिम ‘ ऑफ द इयर पुरस्कार -सह्याद्री ऍडवेंचर क्लब (मुंबई)
६) ‘ बहुआयामी ट्रेकर‘ ऑफ द इयर पुरस्कार – प्रसाद वाघ (पुणे)
७ ) ‘वाटाड्या’ जीवन गौरव सन्मान पुरस्कार- भाऊ गिर्हे (उडदावणे,भंडारदरा)
८) रेस्क्यू टिम’ ऑफ द इयर पुरस्कार – महाबळेश्वर ट्रॅकर (महाबळेश्वर)
९) ‘दुर्गसंवर्धन- टीम ऑफ द इयर पुरस्कार – दुर्गवीर प्रतिष्ठान,(मुंबई)
१०)’ ट्रेकर’ ऑफ द इयर पुरस्कार- मनजीत माळवी (बदलापूर)
११) ‘हिरकणी’ सन्मान पुरस्कार- श्रुती शिंदे (लोणावळा).
# २०२४ वर्षात आयोजित विविध स्पर्धांचे विजेते
खालीलप्रमाणे:-
१) ‘शॉर्टफिल्म’ ऑफ द इयर मानकरी – विशाल साळुंखे ( चिपळूण)
२) ‘फोटोग्राफर’ ऑफ द इयर मानकरी (कॅमेरा) – अमेय मुरुडकर (मुंबई)
३) ‘फोटोग्राफर’ ऑफ द इयर मानकरी (मोबाईल) – राहुल बुलबुले, पुणे
४) ‘ब्लॉगर ‘ऑफ द इयर मानकरी- ऋतुजा धामणे, नाशिक
५) ड्रोन फोटोग्राफ ऑफ द इयर- पृथ्वीराज शिंदे (वडाळीभोई)
६) रिल मेकर ऑफ द इयर मानकरी- अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
