निफाड:नळाचं पाणी रस्त्यावर येतं सांगितल्याने मारहाण
वेगवान नाशिक
नाशिक, ता. 26 जून 2024 –
ग्रामपंचायत च्या नळाचं पाणी रस्त्यावर येतं, तुमचा नळबंद करा असं सांगितल्याचा राग आल्याने मारहाण झाल्याची घटना निफाड तालुक्यातील कुरडगाव येथे घडली आहे.
याबाबत ची अधिक माहिती अशी, निफाड तालुक्यातील कुरडगाव येथील फिर्यादी, दत्तात्रेय गोविंदराव सांगळे वय ५४ (रा.कुरडगाव ता.निफाड) व संशयीत आरोपी सचिन वाघ हे एकाच गल्लीत शेजारी शेजारी राहतात फिर्यादी दत्तात्रेय यांनी संशयीत आरोपीस तुमचा ग्रामपंचायत चा पाण्याचा नळ बंद करा, त्याच पाणी रस्त्यावर येतं असं सांगितल्याचा राग आल्याने, आरोपीने दत्तात्रेय यांना शिवीगाळ करत, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादी ची बहिण पुंजाबाई सांगळे ही भांडण सोडवण्यास गेली असता तिच्या डोक्यात दगड मारुन इजा केली म्हणुन आरोपी सचिन वाघ याच्या विरोधात निफाड पोलिसांत भादंवी ३२४,३२३,५०४,५०६, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार ढेकळे करत आहे.