नाशिक क्राईमनाशिक ग्रामीण

*नाशिक जिल्ह्यात लहान मुलांच्या हातात वाहनाचे स्टेअरिंग*

*नाशिक जिल्ह्यात लहान मुलांच्या हातात वाहनाचे स्टेअरिंग*


वेगवान मराठी /नाशिक /एकनाथ भालेराव

येवला /दिनांक 25जून 2024/
अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे.
नुकतेच पुणे येथे झालेल्या एका प्रकरणात अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दुचाकीवरून निघालेल्या दोघांना उडवले. यात दोघांचाही मृत्यू झाला या घटनेवरून महाराट्र प्रादेशिक परिवहन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे
मात्र अजून सुद्धा नाशिक जिल्यात व शहरी भागात अल्पवायीन मुलांच्या हातात मोटारसायकल, चार चाकी वाहने दिसून येत असून पालकांना सर्व काही नियम माहित असून सुद्धा पालक अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत.
तर नाशिक जिल्यात, शहरात वाहतूक पोलीस नियुक्त असताना सुद्धा वाहतूक पोलिसांचे त्यांच्या डोळ्यासमोरच

दुर्लक्ष होताना दिसून येत आहे कडक व नियमानुसार कारवाई होत नसल्याने अल्पवयीन मुलांची वाहने चालविण्याची संख्या वाढतच आहे
अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना आढळल्यास पालकांना २५ हजारांचा दंड व तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते
नाशिक जिल्यात, अनेक शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकीचा वापर करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन नकोच अल्पवयीन मुलांना शाळा, महाविद्यालयात

जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. शिवाय स्कूल बस, ऑटोरिक्षाही भरपूर आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत.
त्यांना वाहन पळवताना वेग मर्यादाही अनेकदा लक्षात येत नाही व त्यातून अपघात होतात. यात पालकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे पालकांनी टाळायला हवे आहे मोटार वाहन

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

कायदा… मोटार वाहन कायदा १९८८ व केंद्रीय

मोटार वाहन नियम १९८९ मध्ये नमूद केल्याप्रमाणो १८ वर्षांखालील मुलगा वाहन चालवताना आढळल्यास वाहन मालकाला शिक्षा होऊ शकते. सार्वजनिक ठिकाणी ५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्याला दंड केला जाऊ शकतो. अल्पवयीन वाहनचालकाच्या पालकांना तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे मात्र तरी कुठेही होताना दिसत नाही.
पोलिसांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना पकडले की सर्वांत अगोदर पालकांचा फोन किव्हा राजकारण्यांचा फोन येऊन गाडी सोडायला भाग पाडले जाते नाशिक जिल्यात पोलिसांनी गाडीचे कागदपत्रे सोबतच वाहन चालवण्याचा परवाना तपासणी मोहीम हाती घेणे अत्यावश्यक असून कडक कार्यवाहीची गरज आहे ज्याने पालक अल्पवायीन पाल्या जवळ वाहन देणार नाहीत मात्र तसे होत नाही त्याने अल्पवायीन मुले गाड्या पाळवताना दिसून येत आहे


एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!