नाशिक क्राईम

नाशिक जिल्ह्यात शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाने कोट्यावधींची फसवणूक


  1. वेगवान नाशिक/ अरुण थोरे

नाशिक: दि२५ जुन २०२४

 

तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.शेअर मार्केटमध्ये पैसे लावून अनेक जण करोडपती होताना आपण पाहिले आहे. मात्र आम्ही जी घटना तुम्हाला सांगणार आहे. ती नाशिक जिल्ह्यातील अशाच एका शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीची असुन, ह्या व्यक्तीची दोन कोटी हुन अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. एका नामांकित कंपनीचा फेक अॅप बनवून फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

 

निफाड तालुक्यातील ओझर येथील श्याम बाबू सूर्यनारायण मुक्कू वय ४९ वर्ष (रा.१०‌वा मैल ओझर) येथे दूध डेअरी चा व्यवसाय करतात सोबतच ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे हे जिओजीत फायनान्सीयल सर्विसेस लिमिटेड नावाची शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी आहे.या कंपनीच्या नावाने व्हाट्सअप ग्रुप असून, व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संशयित आरोपी जयंत पिरामल (चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर जिओजित फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेड) व दुसरा संशयित नाव माहीत नाही यांनी जिओजीत फायनान्सीयल सर्विसेस च्या नावाने फेक अॅप तयार करून वेळोवेळी श्यामबाबू मुक्कु यांच्याकडून आयपीओ सबस्क्रीप्शन च्या नावाखाली २ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली असून,

सदर संशयित आरोपींवर नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलिसांकडे भांदवी कलम ४१९,४२०,३४ आयटी अॅक्ट कलम ६६ क ६६ ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (सायबर क्राईम नाशिक ग्रामीण) हे करत आहेत.


अरुण थोरे

अरुण थोरे  गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून  शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!