मामाच्या गावात येऊन भाचीने असं केलं की सर्वांना धक्काच बसला
मामाच्या गावात येऊन भाचीने असं केलं की सर्वांना धक्काच बसला
वेगवान नाशिक
वणी, ता. 25 जून 2024 – आंबानेर, ता. दिंडोरी येथे मामाच्या गावी आलेल्या भाचीने शेतातील झाडास ओढणी बांधून गळफास घेतल्याची घटना घडली आहे. (Niece took extreme step who came to uncle village)
सीबील स्कोअरची सक्ती न करता आता मिळेल कर्ज
कृषी कर्जमाफीने धरला जोर, राज्यात कर्जमाफीला पोषक वातावरण?
आंबानेर (सागपाडा), ता. दिंडोरी येथील भाऊसाहेब रोहीदास जाधव, वय ३८ यांच्याकडे त्यांची भाची स्वाती हनुमान कराटे वय १७ वर्ष, रा. कोराटे ता. दिंडोरी ही पाहुणी म्हणून आली होती. सोमवार, ता. २४ रोजी सकाळी साडेपाच वाजता स्वाती हि मामा भाऊसाहेब जाधव यांच्या राहत्या घरी अंबानेर (सागपाडा) येथे रात्री केव्हातरी झोपेतून उठून घराचे बाहेर जाऊन तिच्याकडे असलेली पांढऱ्या रंगाची त्यावर काळे ठिपके असलेली सुती कापडाची ओढणीच्या सहाय्याने बकाणा झाडाच्या फांदीस गाठ मारून स्वत: च्या गळ्याला गाठ मारून गळफास घेतला.
रात्री धुमधडक्यात वाढदिवस झाला, अन.. पहाटे साप चावला
सदरची बाब लक्षात येताच जाधव यांनी नातेवाईकांच्या मदतीने भाची स्वाती हिस खाली उतरवून तिला औषधोपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी भाची स्वाती हनुमान कराटे हिस तपासुन मयत घोषीत केले. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अल्पवयीन असलेल्या स्वातीने कोणत्या कारणास्तव टोकाचे पाऊल उचलले याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत.