नितीन गडकरींनी खासदारकीची शपथ घेताच विरोधकांकडून अनोखं स्वागत….

वेगवान नाशिक/अरुण थोरे
काल संसदेत खासदारांचा शपथविधी झाला. हा शपथविधी होत असताना, विरोधकांनी संविधान हातात घेऊन संसदेत प्रवेश केला, यावेळी पंतप्रधान मोदींनी शपथ घेताच राहुल गांधी यांनी मोदींना आपल्या हातातील संविधान दाखवले. तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उठताच विरोधकांनी नीट नीट अशा जोरदार घोषणा दिल्या. मात्र दुसरीकडे नितीन गडकरींनी खासदारकीची शपथ घेताच विरोधकांनी त्यांचं अनोखं स्वागत केल.
काल संसदेत खासदारकीचा शपथविधीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांनी शपथ घेताच गडकरींचा विरोधकांनी बाकं वाजून स्वागत केले एकीकडे पंतप्रधान मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान खासदारकीची शपथ घेत असते विरोधकांनी काहीसा गोंधळ घातला. मात्र गडकरींच्या शपथ घेतली त्या वेळेस विरोधकांनी त्यांचं स्वागत केल्याने राजकीय वर्तुळात कालचा प्रसंग दिवसभर चर्चेत राहिला.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे नेहमीच मितभाषी व आपल्या अजातशत्रू स्वभावाने सगळ्यांनाच भावतात, नेहमी स्पष्टवक्तेपणे बोलणं ही त्यांची खासियत, त्यांनी अनेकदा आपल्या भाषणात लोकशाही बळकटीकरणासाठी विरोधक हे मजबूत असायला हवे अशा प्रकारचे मत व्यक्त करत असतात. आजच्या या प्रसंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधकांचे हे मन जिंकल्याचे बोलला जात आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.