येवलाः वीर जवान ऋषिकेश कदम आनंतात विलीन
वेगवान नाशिक / मुक्ताराम बागुल, भागवत झाल्टे
कातरणी, ता. 23 जून 2024 -नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या कातरणी येथील प्रगतिशील शेतकरी विजय काशिनाथ कदम यांचा मुलगा ऋषिकेश विजय कदम यांचे शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अहमदनगर येथे कर्तव्यावर असताना मोटरसायकलवर अपघाती निधन झाले असून कातरणी गावासह संपूर्ण येवला तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर कातरणी येथे मुळगावी शासकीय इतमामात अंत्यविधी संपन्न झाला.
View this post on Instagram
वीर जवान मेजर के. ऋषिकेश विजय कदम हे भारतीय सैन्य दलात गेल्या सात वर्षापासून कार्यरत होते. सध्या ते अहमदनगर येथे बेस्ट कॅम्पमध्ये आपली सेवा देत होते. 55 आर्म ट्रेजमेंटचे वीर जवान अहमदनगर येथे कार्यरत असताना त्यांना दिनांक 21 जून 2024 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास मोटर सायकलवर अपघातात निधन होऊन वीरमरण आले.
त्यांचा कातरणी या मूळगावी शासकीयत इतमामात अंत्यविधी करण्यात आला. कै.ऋषिकेश विजय कदम यांच्या पश्चात दोन वर्षाचा एक मुलगा, आई वडील, आजी आजोबा असा मोठा परिवार असून त्यांचा भाऊ विकास विजय कदम हे आर्मी लिह लदाक उत्तराखंड येथे कार्यरत असून ड्युटी बजावत आहेत.कै. ऋषिकेश कदम यांच्या अंत्यविधीच्या वेळी सामाजिक, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी,व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.