ओबीसी उपोषणकर्ते गजू घोडके यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सन्मान
ओबीसी उपोषणकर्ते गजू घोडके यांचा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सन्मान

वेगवान नाशिक /नाशिक नितिन चव्हाण:, ता २३जून २०२४
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर श्री गजू घोडके यांनी नाशिकमध्ये उपोषण केले होते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
आज नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गजू घोडके यांचा सन्मान केला.
त्यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, अर्चित घोडके, नाना पवार पहिलवान गोरख चहाळे, रामा गायकवाड, सागर मरवट, किरण भावसार, राजाभाऊ सोनार, मिलिंद सोनार, दिलीप सोनार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात विविध ठिकाणी उपोषण करण्यात आले.
नाशिक मध्येही सुवर्णकार समाजाचे पदाधिकारी श्री गजू घोडके यांनी उपोषण केले. मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतले.
आज श्री गजू घोडके यांनी मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी गजू घोडके यांचा सन्मान केला.
