वडाळागाव युवा मंच व विराट मित्र मंडळ तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा संपन्न
वडाळागाव युवा मंच व विराट मित्र मंडळ तर्फे करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा संपन्न

वेगवान नाशिक/ नाशिक नितिन चव्हाण:,ता २३जून २०२४
वडाळागाव युवा मंच व विराट मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यामानाने वडाळागाव परिसरातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा नभांगन लॉन्स येथे संपन्न झाला.
नभांगन पाहुणे येथील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगेश बहेती व करिअर मोटिवेशनल मार्गदर्शक आसिफ शेख यांनी सर्व विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले. योगेश बहेती यांनी करिअर निवडतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
आसिफ शेख यांनी विध्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी तसेच व्यक्तिमत्त्व विकासा बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच,भविष्यातील होणारे बदल लक्षात घेता केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून बौद्धिक व तार्किक ज्ञान आत्मसात करण्याची विशेष गरज आहे.
सकारात्मक विचारासोबतच सकारात्मक परिश्रम देखील घेतले पाहिजे असे प्रेरणादायी मार्गदर्शन आसिफ शेख यांनी केले. कार्यक्रमाला संदीप सोनार,के.बी.एच. विद्यालय वडाळाचे मुख्याध्यापक संजय म्हस्कर, जय कोतवाल, रमिज पठाण, सचिन साळवे व्यासपीठावर उपस्थित होते.
– सदर कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडवून आणणे असा होता.
जय कोतवाल सामाजिक कार्यकर्ते ——-
प्रास्ताविक आयोजक संदीप सोनार यांनी केले. सूत्रसंचालन वैशाखी सोनार यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते रमिज पठाण यांनी मानले. यावेळी तुळशी सुरेश परदेशी, हमझा नईमखान पठाण, कुणाल त्रंबक पागी, सानिया अख्तर शेख, मुस्कान मुश्ताक खान, स्वालेहा मुस्तकीम अन्सारी या विद्यार्थ्यांबरोबरच इतर अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाण पत्रे व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
