नाशिक ग्रामीण

आता तरी प्रशासन जागे होणार का?

भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुण ठार


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे, मनमाड,नांदगाव –

मनमाड शहरातून जाणारा मनमाड-नगर हायवेवर कॅम्प परिसरातील हॉटेल संदीपच्या जवळ कंटेनर आणि स्कूटरचा अपघात होऊन अनोश सुनील व्यवहारे,वय 17 वर्ष राहणार मनमाड याचा मृत्यू झाला.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

स्कूटर क्रमांक एमएच 41 बीएफ 4119 व कंटेनर क्रमांक एचआर 55 एपी 7428 यांची धडक होऊन स्कूटर चालक अनोश सुनील व्यवहारे याचा मनमाडकडून येवलाकडे जाणार्‍या कंटेनरच्या चाकाखाली येऊन डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघाती मृत्यू झाला.

याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करत आहेत.

दिवसेंदिवस मनमाड-नगर राज्य महामार्गावर वाहतुकीचा बोजा वाढत असल्याने कॅम्प परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राज्य महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे.

अनेक अपघात यापूर्वीही घडलेले आहेत.शहराची वाढती लोकसंख्या आणि अपघाताचे प्रमाण पाहता नांदगाव चौफुली पासून अयोध्या नगर पर्यंत तरी निदान उड्डाणपूल होणे आवश्यक असल्याची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

याबाबत प्रशासन काय नियोजन करते?हे बघणे आवश्यक आहे.


अविनाश पारखे

Shri.Avinash ParkheWorking with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right...what is truth...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!