नाशिक शहर
या कारणासाठी शिंदे टोल नाक्यावर झाले धरणे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने केली टोल माफीची मागणी
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik,२० जून-
नाशिकरोड :- शिंदे टोलनाका येथे वीस किलोमीटर अंतरावरील गावांना टोल माफ करावा यासाठी शिंदे टोल नाका येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले .
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख मागणी म्हणजे शिंदे टोल नाक्यापासून जी गावे 20 किलोमीटरच्या आत येतात त्या सर्व गावांमधील वाहनांना टोल माफ करण्यात यावा या मागणीसाठी सकाळी दहा वाजेपासून शिंदे टोलनाका ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी नाशिक येथील राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता बोरसे, आहेर, हरने आदींना निवेदन देण्यात आले व व त्यांना सदर नियोजनामध्ये सात दिवसाच्या आत वीस किलोमीटरच्या जी गावे आहेत त्या गावांना टोल माफ करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले त्यांनी ही मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले व तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली त्यांना वाढीव मोबदला मिळवा. बाहय रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. टोल माफी शक्य नसल्यास टोल नाका ७० किलोमीटर पुढे नेण्यात यावा किंवा स्थानिकांना आधार कार्डवर सोडण्यात यावे अशी मागणी या धरणे आंदोलनात नाशिक तालुका अध्यक्ष रामकृष्ण झाडे युवक कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस दिपक वाघ जिल्हा उपध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे,सुनील कोथमिरे,अशोक पाळदे,डॉ. युवराज मुठाळ, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ खातळे, संजय सोनवणे, सिन्नर अध्यक्ष अशोक जाधव, कैलास भांगरे, मोहनीश दोंदे, मोतीराम जाधव, विलास जगळे, कैलास कळमकर, चेतन सांगळे, सोमनाथ धात्रक, कृष्णा बागुल, कचरू म्हस्के, राजेंद्र बोराडे,भगवान कटाळे, जयराम कटाळे,मधुकर ढोकणे आदी उपस्थित होते.