ओबीसी आरक्षण प्रश्नावर जरांगे-भुजबळ यांनी एकत्र यावं?
वेगवान नाशिक/अरुण थोरे
मुंबई:१९ जून २०२४
राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून मोठा पेच निर्माण झालेला असताना, मराठा व ओबीसी आरक्षण प्रश्नी छगन भुजबळ व जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा असे, मत आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. राज्यात लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला घेऊ नये, यासाठी उपोषण सुरू केले आहे.तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या उपोषणाचा पवित्रा घेतला होता. या सर्व कारणांमुळे राज्यात मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नावर मोठा पेच प्रसंग सरकार समोर पडल्याचा दिसून आला. त्यातच आता बच्चू कडू यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र यावे असे मत व्यक्त केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रीयेत त्यांनी सांगितले की राज्यात मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न चिघळतत असताना ओबीसी नेते छगन भुजबळ व मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा व ओबीसीतील जे आरक्षण आहे त्यात वाढ करून घ्यावी. सर्वसाधारणपणे जर 15 टक्क्यापर्यंत जर वाढ झाली तर हा प्रश्न सुटू शकतो. अशा प्रकारची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की जरांगे व भुजबळ साहेब यांनी महाराष्ट्र म्हणून एकत्र यावे व ओबीसीची टक्केवारी वाढवून जर घेतली तर हा वाद इथेच थांबेल व जरांगे यांची जी कुणबीची मागणी आहे ती ही पूर्ण होईल.व ओबीसींच्या आरक्षणात ही वाढ झाल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. असे मत कडू यांनी व्यक्त केले आहे.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.