सरकारी माहिती

‘त्या’ माजी सीईओच्या घरी सीबीआयचे छापे

भ्रष्टाचार प्रकरणी मालमत्ताही केली गोठीत


भ्रष्टाचार प्रकरणी कँटोन्मेंट बोर्डाच्या माजी सीईओच्या घरी सीबीआयने छापे

 Wegwan Nashik / वेगवान नाशिक- दि.१९ :- 

     येथील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात तीन वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू असताना केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने नुकतीच त्यांच्याशी संबंधित असलेल्या उत्तर प्रदेश येथील लखनऊ व बिहारच्या जुमई येथील मालमत्तेची झडती घेण्यात येऊन सर्व मालमत्ता गोठीत करण्यात आली आहे.

   संरक्षण मंत्रालयाच्या उपसचिव (दक्षता) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार,कुमार यांनी २ ऑगस्ट २०२१ रोजी कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली कॅम्प अखत्यारीत येणाऱ्या शहा लँड डेव्हलपर्सच्या मालकीच्या लेआउट प्लॅनला मंजुरी दिली होती. सात दिवसांनंतर कुमार यांनी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. कारण त्यांची बेंगळुरू येथे बदली झाली.

 यानंतर लगेचच १५ सप्टेंबर रोजी कुमारच्या पालकांच्या नावे प्रत्येकी ९ लाख रुपये किंमतीचे सहा भूखंड खरेदी करण्यात आले. दुसऱ्या दिवशी कुमारच्या पालकांनी या भूखंडाची मालकी पुन्हा हस्तांतरित केली, असा आरोप तक्रारीत नमुद करण्यात आला आहे. विशेष पॉवर ऑफ ॲटर्नीद्वारे त्याच्या पत्नीला हस्तांतरित केले होते. सीबीआयच्या खटल्यानुसार, कुमारने त्याच्या पालकांना सरकारी रेकॉर्डमध्ये उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना आश्रित म्हणून घोषित केले होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!