नाशिक ग्रामीण

वैभव पवार उत्कृष्ट कुक्कुटपालक व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित


वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे या नोंदणीकृत, स्वयंसेवी संस्थेच्या वतीने स्वप्निल ऍग्रो वडाळाचे संचालक वैभव पवार यांना नुकताच पुणे येथे राज्यस्तरीय उत्कृष्ट कुक्कुटपालक व्यावसायिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुण्यातील पशुसंवर्धन क्षेत्रातील सेवानिवृत पशुवै‌द्यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे या संस्थेची नोंदणी केली आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातील पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पशुवैद्य, पशुपालक, कुक्कुटपालक, अध्यापक, पशुवैद्य, शेळीपालक, उत्कृष्ठ मेषपालक आदीनां राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच पशुसंवर्धन क्षेत्रात काम केलेल्या संस्था व व्यक्तींना “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.

संस्थेच्या वतीने “वेंकटेश्वरा हॅचरीज समूहाततील उत्कृष्ट कुक्कुटपालक व्यावसायिक पुरस्कार देवळा तालुक्यातील वडाळा येथील स्वप्निल ऍग्रो वडाळाचे संचालक वैभव पवार यांना राज्यसभा सदस्य मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. र. त्रिं. वझरकर, संस्थेचे सचिव डॉ. सुनिल राऊतमारे, डॉ.श्याम कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉ. विवेक क्षिरसागर, कोशाध्यक्ष डॉ. ध.मो. चव्हाण व कार्यकारणीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

वैभव पवार यांना राज्यस्तरीय आदर्श कुक्कुटपालक व्यावसायिक पुरस्कार मिळाल्याबद्दल वेंकटेश्वरा हॅचरीज समूहाच्या वतीने डॉ. पेडगावंकर व डॉ. मोधे यांसह कुक्कुटपालन व्यवसायिक संघटना महाराष्ट्र राज्य व नासिक जिल्ह्यातील कुक्कुटपालक व्यावसायिक व  विविध संस्थांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!