मोठ्या बातम्या
राज्यभरात २५ लाख झाडांचे हा ग्रूप करणार वृक्षारोपण
जुलै महिन्यात राज्यभरात विशेष वृक्षारोपण मोहीम

जैन अलर्ट ग्रुपच्या वतीने २५ लाख झाडांचे होणार वृक्षारोपण
जुलै महिन्यात राज्यभरात विशेष वृक्षारोपण मोहीम
Wegwan nashik/वेगवान नाशिक १४ जून-
नाशिकसह देशभरामध्ये 400 पेक्षा अधिक शाखा व चाळीस हजार पेक्षा जास्त युवक जोडलेला असलेल्या जैन अलर्ट ग्रुप च्या वतीने पुढील महिन्यापासून जागतिक तापमान वाढीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील हिरवाईचे संवर्धन व नैसर्गिक रित्या गारवा निर्माण करण्यासाठी या बिन सरकारी संस्था असलेला हा ग्रुप वृक्षारोपणासाठी सज्ज झाला आहे.
जैन धर्माचे परमपूज्य आचार्य श्री रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांच्या आशीर्वादाने गेल्या ३० वर्षापासून देश,धर्म,समाज,शिक्षण व आरोग्याशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.
हा वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यासाठी या समूहातील विविध सदस्य आज दि.१४ नाशिक ते नांदेड पर्यंत प्रवास करत मालेगाव,धुळे, नंदुरबार, दोंडाईचा, चाळीसगाव, जालना,संभाजीनगर आदीसारख्या ३७ गावांमध्ये भेट देत तेथील राजकीय सामाजिक व प्रशासकीय यंत्रणेसोबत शेतकरी व गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत येथे वृक्षारोपणासाठी असलेल्या जागांची माहिती घेत या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करणार असून आज शुक्रवार दि.१४ पासून या मोहिमेला प्रारंभ होणार आहे.
जैन अलर्ट ग्रुप ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. गेल्या दोन-तीन वर्षाभरापासून राज्यभरात वाढलेले तापमान पाहता पर्यावरणाच्या दृष्टीने कार्य करण्याचा निर्धार करत २५ लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.- अभिजीत शहा जैन अलर्ट ग्रुप,नाशिक
