नाशिक क्राईम

काकाने पुतणीला ऊसात उचलून नेले…. व्हिडीओ


वेगवान नाशिक / सागर मोर

दिंडोरी, ता. 14 जून 24 –  तालुक्यातील चारोसे येथे एका अडीच वर्षांच्या मुलीवर चुलत काकाने बलात्कार केल्याची प्रकार उघडकीस आला या बाबत वणी पोलीस ठाण्यात पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणार ह्या दिवशी 

वणी पोलीस ठाणे हद्दीत चारोसे गावात एका अडीच वर्षांची मुलगी दि.१३जुन रोजी सायंकाळी ०५:३० वाजता सुमारास घरासमोर खेळत असताना पंडीत मुलीचा चुलत काका याने तिला घरासमोर घेऊन गेला. मुलगी बराच वेळ झाले दिसत नाही म्हणून तिचे घरातील व आजू बाजूचे लोकांनी तिचा शोध घेत असताना रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात संशयीत आरोपी- रतन भास्कर गांगुर्डे,वय २१ वर्ष, राहणार- चारोसे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मुलीसह दिसुन आला.

एसटीतील बदल्यांसाठी आता या तंत्रज्ञानाचा होणार वापर

त्याने अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समजले या बाबत पीडीत मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर बाबत मुलीचे आईचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.पोकसो कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून.पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.सुनिल पाटील करीत आहे.

वणी पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक १८३/२०२४ कलम ३७६(२)फ , ३७६ अब, भा.द.वी सह कलम ४,६ प्रमाणे करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!