किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणार ह्या दिवशी
वेगवान नाशिक/अरुण थोरे
नाशिक/१४ जून २०२४
पंतप्रधान सन्मान योजनेच्या १७ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली असून पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण पंतप्रधानांच्या हस्ते १८ जूनला होणार असल्याची माहिती समोर येत आहे
केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाल्या बरोबर पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेच्या फाईलवर स्वाक्षऱ्या केल्या मात्र किसान सन्मान योजनेच्या हप्ता कधी वितरित होईल याबाबत अधिकृत माहिती दिली नव्हती. आता मात्र किसान सन्मान योजना वितरणे बाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे पंतप्रधान मोदी या योजनेच्या सतराव्या हप्त्याचे वितरण वाराणसीतुन करणार आहेत.
निवडणुकीच्या आधी किसान सन्मान योजनेत बदल होणार असल्याचे चर्चांना उधाण आले होते. याबाबत मात्र अधिकृत माहिती समोर आली नसुन. बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.