नाशिक ग्रामीण

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना  मिळणार पाठ्यपुस्तके – गटशिक्षणाधिकारी बच्छाव


वेगवान नाशिक / बाबा पवार

 

देवळा : शासनाकडून दरवर्षी पहिली ते आठवी पर्यंत मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात. यावर्षी हि देवळा तालुक्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या मराठी माध्यमाच्या ७८०२ विध्यार्थ्यांना तर सेमी इंग्रजीच्या ८०८८ अश्या एकूण १५८९० विध्यार्थ्यांना शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन करण्यात आले असून, यावर्षी गट स्तरावरून थेट शाळेत पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन झाले असल्याचे देवळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव यांनी सांगितले.

चालूवर्षी गटस्तरावर आत्तापर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमाची शंभर टक्के सर्व पुस्तके गटावर प्राप्त झाली आहेत. इयत्ता निहाय लागणारी पुस्तक संख्या पहिली ६१३, दुसरी ९०४, तिसरी ९०७, चौथी ९२६, पाचवी ७३४, सहावी १११३, सातवी १२७८, आठवी १३२७ अशी मागणी विभाग स्तरावर करण्यात आली होती. पैकी विभागीय स्तरावरून शंभर टक्के पुस्तके तालुकास्तरावर प्राप्त झाली आहेत. व तालुकास्तरावरून शाळांना पुस्तके वितरीत करण्यात आले आहेत. सेमी इंग्रजी माध्यमासाठी पहिली ७०४, दुसरी ६६७, तिसरी ८६६, चौथी १०१३, पाचवी ११८८, सहावी ११८७, सातवी १२५९ , आठवी १२०४ अशी ८०८८ पुस्तके गट स्तरावर प्राप्त होऊन तालुक्यातील एकशे सतरा प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा, आश्रमशाळानां पुस्तके वितरीत करण्याचे नियोजन गटशिक्षण अधिकारी सतीश बच्छाव, शिक्षण विस्तार अधिकारी किरण विसावे, एल. व्ही. सूर्यवंशी, केंद्रप्रमुख घनश्याम बैरागी, जी. पी. लोंढे करत असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू –
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक, पालक बैठकांचे आयोजन करणे, शाळेची इमारत, वर्गखोल्या तसेच परिसर स्वच्छता करण्याची कामे सुरू केली आहेत. येत्या शनिवारी दि. १५ रोजी विद्यार्थ्यांचे शाळेत आनंदपूर्ण वातावरण, उत्साहात स्वागत करण्यासाठी शिक्षकांकडून प्रवेशोत्सवाचे नियोजन केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीसाठी प्रयत्न –
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन तसेच खाऊ वाटप करून त्यांचे स्वागत करावे, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असावी, यासाठी गावागावांत शाळास्तरावर शिक्षक पालकांना भेटून आवाहन करीत आहेत.

 

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!